मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट-रोहितमुळे BCCI हैराण! टीम इंडियाला मिळणार तिसराच कॅप्टन? हा खेळाडू रेसमध्ये

विराट-रोहितमुळे BCCI हैराण! टीम इंडियाला मिळणार तिसराच कॅप्टन? हा खेळाडू रेसमध्ये

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma) यांच्यात वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) हे दोघंही एकत्र टीम इंडियातून (Team India) खेळलेले नाहीत, त्यातच बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीकडून वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतली, त्यामुळे तो नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 14 डिसेंबर : विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma) यांच्यात वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) हे दोघंही एकत्र टीम इंडियातून (Team India) खेळलेले नाहीत, त्यातच बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीकडून वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतली, त्यामुळे तो नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. एवढच नाही तर त्याने दक्षिण आफ्रिकेतल्या (India vs South Africa) वनडे सीरिजमधून माघार घेतली असल्याचंही वृत्त प्रसिद्ध झालं आहे. या सगळ्या संशयाच्या वातावरणात बीसीसीआयसमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. हा वाद असाच कायम राहिला तर विराट-रोहित नाही तर बीसीसीआयला नवाच कर्णधार शोधावा लागेल, या परिस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) याचं नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे आहे.

रोहित शर्मा दुखापतीमुळे टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे, तर विराट कोहली वनडे सीरिजमधून ब्रेक घेण्याची शक्यता आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यानेही या दोन्ही खेळाडूंनी घेतलेल्या ब्रेकच्या वेळेवर शंका उपस्थित केली आहे. विश्रांती घेण्यात काहीच चूक नाही, पण याची वेळ योग्य पाहिजे. आता दोघांच्या गैरहजेरीत भारताला वनडे टीमचा पर्याय शोधावा लागणार आहे, असं अझरुद्दीन म्हणाला.

रोहित शर्माचं वय 34 आणि विराटचं 33 वर्ष आहे, त्यामुळे दोघं जास्त काळ टीम इंडियाचे कॅप्टन राहू शकत नाहीत. या दोघांचं वय बघता बीसीसीआयला भविष्यात तरुण नेतृत्व शोधावं लागणार आहे. वनडे आणि टी-20 साठी ऋषभ पंत, श्रेयस अय्यर ही नावं आहेत, पण या दोघांपेक्षा केएल राहुल उजवा ठरू शकतो. राहुलकडे आयपीएलच्या कॅप्टन्सीचाही अनुभव आहे, तसंच त्याला तणाव झेलण्याचाही अनुभव आहे.

राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे, द्रविडनेही अनेकवेळा केएल राहुलला त्याच्या बॅटिंगसाठी मदत केली आहे, त्यामुळे या दोघांमध्ये असलेल्या नात्याचा टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. राहुल द्रविडने मात्र कॅप्टन्सीबाबत अजून कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही.

1 जानेवारी 2020 पासून वनडेमध्ये केएल राहुलने भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक 2 शतकं केली आहेत. या दरम्यान तो सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्येही पहिल्या क्रमांकावर आहे. राहुलने 12 इनिंगमध्ये 62 च्या सरासरीने 620 रन केले, यामध्ये 2 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे, म्हणजेच राहुलने प्रत्येक दुसऱ्या इनिंगमध्ये 50 पेक्षा जास्त रन केले.

First published:

Tags: Kl rahul, Rohit sharma, Team india, Virat kohli