मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रोहितला Team India चा कर्णधार करावं, हे दोघे उपकर्णधार; दिग्गज क्रिकेटपट्टूने दिली या नावांना पसंती

रोहितला Team India चा कर्णधार करावं, हे दोघे उपकर्णधार; दिग्गज क्रिकेटपट्टूने दिली या नावांना पसंती

टीम इंडियाच्या पुढील कर्णधार आणि उपकर्णधारांसाठी नावे सुचवली आहेत. त्यांनी म्हटलंय की, भारताला पुढील वर्षी टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे, त्यामुळं सध्या कोणीही कर्णधार बदलण्यावर जास्त चर्चा करणं योग्य ठरणार नाही.

टीम इंडियाच्या पुढील कर्णधार आणि उपकर्णधारांसाठी नावे सुचवली आहेत. त्यांनी म्हटलंय की, भारताला पुढील वर्षी टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे, त्यामुळं सध्या कोणीही कर्णधार बदलण्यावर जास्त चर्चा करणं योग्य ठरणार नाही.

टीम इंडियाच्या पुढील कर्णधार आणि उपकर्णधारांसाठी नावे सुचवली आहेत. त्यांनी म्हटलंय की, भारताला पुढील वर्षी टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे, त्यामुळं सध्या कोणीही कर्णधार बदलण्यावर जास्त चर्चा करणं योग्य ठरणार नाही.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : अनुभवी फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) टी-20 विश्वचषकानंतर या क्रीडा स्वरूपातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील महिन्यात युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेत तो संघाचं नेतृत्व करणार आहे. दरम्यान, महान क्रिकेटपटूंपैकी एक सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या पुढील कर्णधार आणि उपकर्णधारांसाठी नावे सुचवली आहेत. त्यांनी म्हटलंय की, भारताला पुढील वर्षी टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे, त्यामुळं सध्या कोणीही कर्णधार बदलण्यावर जास्त चर्चा करणं योग्य ठरणार नाही.

स्टार स्पोर्ट्सच्या शो 'क्रिकेट कनेक्टेड' मध्ये गावस्कर म्हणाले, मला वाटतं रोहित शर्माला पुढील दोन टी-20 विश्वचषकांसाठी भारताचा कर्णधार बनवने योग्य ठरेल. विश्वचषक स्पर्धा जवळपास एका वर्षाच्या आत होणार आहेत. सध्या टी -20 विश्वचषक एक महिन्याच्या आत यूएई आणि ओमानमध्ये सुरू होईल आणि त्यानंतर आतापासून एक वर्षानंतर दुसरा असेल. त्यामुळं खरंतर या काळात जास्त कर्णधार बदलणे योग्य ठरणार नाही. विराटनंतर रोहित शर्माला माझी कर्णधार म्हणून नक्कीच पसंती आहे.

हे वाचा - IPL 2021: यंदा आयपीएलमध्ये पहिल्यांदा होतेय ही गोष्ट, 8 ऑक्टोबरला घडणार इतिहास

त्यानंतर, मी उपकर्णधार पदासाठी केएल राहुलकडे पाहत आहे. मी ऋषभ पंतच्या नावाचाही विचार करेन कारण तो ज्या प्रकारे स्टार खेळाडूंनी भरलेल्या दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करत आहे आणि त्याच्या खरोखर प्रभावी क्षमता आहे. एनरिक नॉर्खिया आणि कागिसो रबाडासारख्या खेळाडूंचा वापर करून तो टी-20 फॉरमॅटमध्ये गोलंदाजी बदलत आहे. यातून तो खरोखर एक हुशार कर्णधारपणा दर्शवत आहे. आपल्याला नेहमीच असा कर्णधार हवा असतो, जो परिस्थिती समजू शकतो आणि त्यावर त्वरित उपाय करू शकतो. त्यामुळे राहुल आणि पंत हे दोघांकडे मी उपकर्णधार म्हणून पाहतोय.

हे वाचा - IPL Media Rights: BCCI च्या निर्णयामुळे बिघडणार ICC चा ‘खेळ’! वाचा काय आहे नेमकं कारण

सध्या अनेक दिग्गज रोहित शर्माचे नाव सुचवत आहेत. कारण तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. 34 वर्षीय रोहितने मुंबई इंडियन्स (MI) साठी 5 आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत, जी IPL लीगच्या इतिहासातील कोणत्याही कर्णधाराकडून सर्वाधिक आहे. दुसरीकडे, भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) साठी आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.

First published:
top videos

    Tags: Rohit sharma, Sunil gavaskar, T20 world cup, Virat kohali