रोहित शर्माच्या वक्तव्यानं ऋषभ पंतचे करिअर धोक्यात, म्हणाला...

रोहित शर्माच्या वक्तव्यानं ऋषभ पंतचे करिअर धोक्यात, म्हणाला...

दक्षिण आफ्रिका विरोधातील कसोटी सामन्यात पंतला डच्चू देत साहाला संधी देण्यात आली होती.

  • Share this:

विशाखापट्टणम, 07 सप्टेंबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहितनं तुफानी फलंदाजी केली. सलामीचा फलंदाज म्हणून पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या रोहितनं दोन्ही डावांमध्ये शतकी कामगिरी केली. या शतकांसह रोहितनं इतिहास रचला आणि अनेक विक्रमांवर आपले नाव नोंदवले. दरम्यान हा सामना 203 धावांनी भारतानं जिंकला. सामन्यानंतर रोहितनं कसोटी सामन्यांतून बाहेर बसवलेल्या ऋषभ पंतवर मोठं विधान केले. त्यामुळं ऋषभच्या अडचणी वाढल्या आहेत.

रोहित शर्मानं सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ऋषभ पंतवर विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानंतर पंतच्या अडचणी वाढल्या आहेत. रोहितनं यावेळी, “ऋषभ पंतबाबत बोलायचे झाल्यास तो एक चांगला खेळाडू, कोणताही संघ त्याला सामिल करून घेईल. मात्र पंत फलंदाजीमध्ये काय कामगिरी करू शकतो हे आम्हाला पाहायचे आहे. तो मेहनत करत आहे”, असे सांगत पंतनं आपल्या किपिंगवरही लक्ष दिले पाहिले असा सल्ल दिला.

मात्र, रोहित शर्मानं यावेळी ऋध्दीमान साहाचेही कौतुक केले. या सामन्यात फॉर्ममध्ये नसलेल्या पंतच्या जागी ऋध्दीमान साहाला संघात जागा देण्यात आली होती. साहाबाबत बोलताना रोहितनं, “साहानं खुप चांगली किपिंग केली. ज्या वातावरणात आम्ही खेळत होतो, त्या पिचवर किपिंग करणे कठिण असते. मात्र त्यानं चांगली कामगिरी केली. त्याच्या कौशल्यामुळं आफ्रिकेला ज्यादा धावा काढता आल्या नाहीत”, असे सांगत साहा चांगला किपर असल्याचे सांगितले.

वाचा-India vs South Africa : रोहित शर्माच्या एका शतकामुळं 4 फलंदाजांचे करिअर धोक्यात! टीम इंडियाचे दरवाजे झाले बंद?

वेस्ट इंडिज दौऱ्यात संघाला होती साहाची गरज

दक्षिण आफ्रिकेआधी भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी साहाला संघात स्थान मिळाले नव्हते. याबाबत सांगताना रोहितनं, “साहा संघासाठी महत्त्वाचा आहे. साहा वेस्ट इंडिज विरोधात खेळत नव्हता तेव्हा आम्ही त्याची आठवण काढत होतो. जेव्हा जेव्हा पंत सराव करायचा तेव्हा तेव्हा साहा त्याला मदत करायचा. साहा आणि पंतमध्ये खुप चांगली संबंध आहेत”, दोघांचे कौतुक केले.

टीम मॅनेजमेंटनं दिली होती धमकी

एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये पंतला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळं निवड समितीचे प्रमुख एम. एस. के प्रसाद यांनी पंतला धमकी दिली आहे. यासाठी पंतच्या जागी इशान, किशन, संजू सॅमसन आणि इतर खेळाडूंचे पर्याय तयार केले आहे. याआधी भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फलंदाजांना सतत संधी दिली जाणार नाही, अशा शब्दात सुनावले होते. त्यामुळं पंतचे दिवस आता भरले आहे, असेच चित्र दिसत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधातही पंतनं त्याच चुका केल्या. त्यामुळं याचा भुगदंड त्याला भरावा लागणार आहे.

वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO

रोहितमुळं या फलंदाजांचे स्थान धोक्यात

दक्षिण आफ्रिका विरोधात पहिल्या सामन्यात रोहितनं चांगली कामगिरी केली. त्यामुळं संघात कमबॅक करण्यासाठी तयार असलेले शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांचे करिअर धोक्यात आले आहे. हे सर्व खेळाडू काही ना काही कारणामुळं कसोटी संघातून बाहेर आहे. मात्र आता मयंक आणि रोहितच्या तुफानी खेळीमुळं या फलंदाजांना संघात जागा मिळणे कठिण झाले आहे. हे सर्व खेळाडू घरेलु क्रिकेटमध्ये आणि स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. पण टीम इंडियात स्थान मिळणे कठिण झाले आहे.

वाचा-फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग

SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 01:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading