India vs South Africa : फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग

शमीनं दुसऱ्या डावात घेतलेल्या पाच विकेटच्या जोरावर भारतानं 203 धावांनी सामना जिंकला.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2019 02:16 PM IST

India vs South Africa : फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग

विशाखापट्टणम, 06 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. शमीच्या पाच विकेटच्या जोरावर भारतानं 203 धावांनी सामना जिंकला. यासह भारतानं तीन कसोटी सामन्यात 1-0नं आघाडी मिळवली आहे. फिरकी आणि जलद गोलंदाजांच्या खेळीवर आफ्रिकेच्या संघाला संघर्ष करण्याची संधीच मिळाली नाही. यात जडेजानं 4 तर शमीनं 5 विकेट घेत आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणारा शमी चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी वेस्ट इंडिज विरोधात जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पाच विकेट घेण्याची कामगिरी केली होती.

रोहित आणि पुजारा यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर भारतानं 323 धावांवर डाव घोषित करत आफ्रिकेसमोर 395 धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले होते. मात्र पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व ठवले. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 191 धावांवर बाद झाला. यात अश्विननं 1, जडेजानं 4 तर शमीनं 5 विकेट घेतल्या.

Loading...

वाचा-टीम इंडियाची शानदार कामगिरी, दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

दरम्यान या सामन्यात शमीनं घेतलेल्या विकेटनं सर्वांचे लक्ष वेधले. 21व्या ओव्हरमध्ये शमीनं कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसची शानदार गोलंदाजी करत विकेट घेतली. शमीच्या उत्कृष्ठ इनस्विंगवर फाफ बोल्ड झाला. या विकेटनंतर एक सेकंद फाफ मैदानावरच होता. त्याला कळलेच नाही की आपल्यासोबत काय झाले. हा इनस्विंग पाहून समालोचकही हैरान झाले.

वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO

या सामन्यात रोहित शर्मानं फलंदाजीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली. दोन्ही डावात शतकी खेळी केलेल्या रोहितला या सामनावीराचा पुरस्कार मिळाला. पहिल्या डावात रोहित-मयंकनं जबरदस्त सुरुवात केली. त्यानंतर अश्विननं 7 विकेट घेतल, भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. तर, दुसऱ्या डावात रोहित आणि पुजाराच्या शतकी भागिदारीच्या जोरावर भारतानं 395 पर्यंत मजल मारली. भारताचा विजयावर शमी आणि जडेजानं शिक्कामोर्तब केला.

वाचा-कसोटीचा टी-20 तडाखा! क्रिकेटच्या इतिहासात घडला नवा विश्वविक्रम

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...