विशाखापट्टणम, 06 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी आपली सर्वोत्तम खेळी केली. फलंदाजीमध्ये रोहित शर्मानं तर गोलंदाजीमध्ये रवींद्र जडेजानं कमाल केली. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडं मोडलं. जडेजानं आपल्या 27व्या ओव्हरमध्ये कमाल गोलंदाजी केली. एकाच ओव्हरमध्ये त्यानं तीन विकेट घेतल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना कमबॅक करता आला नाही. दरम्यान, या डावात सर्वांचे लक्ष वेधले ते जडेजाच्या एका कॅचनं. जडेजानं हवेत उडी घेत शेवटच्या क्षणात कॅच झेलला. जडेजाच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 27व्या ओव्हरच्य पहिल्याच चेंडूवर जडेजानं क्रिझवर अॅडेन मार्करमचा शानदार कॅच घेत दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका दिला. आफ्रिकेचा संघ या कॅचमधून बाहेर पडत असतानाच त्यानं वर्नोन फिलेंडरला लगेचच माघारी परतवले. त्यानंतरही जडेजा थांबला नाही. जडेजानं या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर केशव महाराजला बाद करत आफ्रिकेला आठवा झटका दिला. जडेजाच्या या एका ओव्हरमुळं दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडं मोडलं. मात्र जडेजाच्या एका कॅचनं सर्वांचे लक्ष वेधले. **वाचा-** कसोटीचा टी-20 तडाखा! क्रिकेटच्या इतिहासात घडला नवा विश्वविक्रम
वाचा- अरे देवा! विक्रमांचा डोंगर उभारणाऱ्या रोहितनं केला एक लाजीरवाणा विक्रम जडेजानं पूर्ण केल्या 200 विकेट रवींद्र जडेजानं पहिल्या कसोटी सामन्यात मोलाची कामगिरी करत आफ्रिकेच्या फलंदाजांन आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. दरम्यान पहिल्या डावात 2 विकेट घेत जडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण केल्या. जडेजानं लेफ्ट आर्म स्पिनर असूनही ही केलेली कामगिरी ऐतिहासिक आहे. जडेजानं 44 सामन्यात 200 विकेट घेण्याची कामगिरी केली. वाचा- रोहित शर्मानं भरमैदानात पुजाराला घातली शिवी, चाहत्यांनी विराटवर काढला राग VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

)







