मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs Eng: सेमी फायलमध्ये रोहित शर्मा खेळणार की नाही? प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली 'ही' मोठी अपडेट

Ind vs Eng: सेमी फायलमध्ये रोहित शर्मा खेळणार की नाही? प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली 'ही' मोठी अपडेट

रोहित शर्मा सेमी फायनलसाठी फिट?

रोहित शर्मा सेमी फायनलसाठी फिट?

Ind vs Eng: नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितनं आपल्या दुखापतीबाबत अपडेट दिली आणि तो खेळणार की नाही या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांनं मिळालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अ‍ॅडलेड, 09 नोव्हेंबर: टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. गुरुवारी अ‍ॅडलेडच्या मैदानात ही महत्वाची आणि निर्णायक लढत पार पडेल. पण या लढतीआधी काल टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला. मंगळवारी सराव करताना रोहितला बॉल लागला आणि त्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर तो नेट्समधू बाहेर पडला. पण नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितनं आपल्या दुखापतीबाबत अपडेट दिली आणि तो खेळणार की नाही या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांनं मिळालं.

रोहित फिट, सेमी फायनलमध्ये खेळणार

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहितनं म्हटलंय, 'मी पूर्णपणे फिट आहे. नेट प्रॅक्टिदरम्यान मला बॉल लागला होता. हलकीशी सूज होती. पण मी आता पूर्णपणे ठीक आहे.' त्यामुळे रोहित शर्मा सेमी फायनलमध्ये खेलणार हे कन्फर्म झालं आहे.

सेमी फायनलविषयी काय म्हणाला रोहित?

सेमी फायनल गाठण्याबाबत रोहित म्हणाला की, बाद फेरीचे सामने महत्त्वाचे आहेत. या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पण सेमी फायनलमध्ये चांगल्या रिझल्टसाठी आम्हाला आणखी चांगला खेळ करण्याची गरज आहे.

हेही वाचा - Ind vs Eng: टीम इंडियाला फायनलमध्ये घेऊन जाणार हा बॉलर? प्रत्येक 11 बॉलनंतर घेतोय विकेट

सूर्यकुमारसाठी, स्काय इज द लिमिट....

सूर्यकुमारविषयी बोलताना रोहित म्हणाला की सूर्यामध्ये जबाबदारी घेण्याची क्षमता आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तो दबाव स्वीकारत नाही आणि कुठल्याही परिस्थितीसाठी खेळण्यासाठी सज्ज असतो. त्यानं मला सांगितलं की त्याला लहान मैदानांवर खेळायला आवडत नाही त्याला तिथे शॉट्ससाठी जागा कमी पडते.

इंग्लंडविरुद्ध निर्णायक लढत

दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदा फायनल गाठण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 2007 आणि 2014 साली टीम इंडियानं टी20 वर्ल्ज कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. आणि आता पुन्हा एकदा टीम इंडिया फायनलच्या उंबरठ्यावर आहे. पण भारतासमोर इंग्लंडचं तगडं आव्हान आहे. याआधी टी20 वर्ल्ड कपमध्ये 2007, 2009 आणि 2012 साली उभय संघात मुकाबले झाले होते. त्यात दोन वेळा टीम इंडियानं तर एकदा इंग्लंडनं बाजी मारली होती. त्यामुळे दहा वर्षांनी पुन्हा एकदा या दोन टीम आमनेसामने येणार आहेत.

First published:

Tags: Rohit sharma, Sports, T20 world cup 2022