मुंबई, 6 ऑक्टोबर: मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ आज पहाटे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन टीम इंडियाच्या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफनं ऑस्ट्रेलियासाठीचं फ्लाईट पकडलं. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत 15 ऐवजी 14 खेळाडूच ऑस्ट्रेलियाला निघाले. तर 15 वा खेळाडू कोण असणार याचा निर्णय ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर घेतला जाईल असं रोहित शर्मानं टी20 मालिकेच्या समाप्तीनंतर सांगितलं होतं. दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी काल रोहित शर्मानं दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. रोहितचा हा फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित-रितिका मुलीसह सिद्धिविनायक चरणी मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री रोहित शर्मा दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला. त्यावेळी त्याच्यासोबत मुलगी समायरा आणि पत्नी रितिकाही होती. यावेळी तिघांच्याही चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसत आहे. तर मुलगी समायरा रोहितच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर रोहित टीम इंडियासह आज पहाटे भारतीय संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला.
Yesterday Rohit Sharma went to a temple in Dadar to take God's blessings for Team India's victory in the World Cup.🥺❤️🙏#RohitSharma | @ImRo45 pic.twitter.com/S5VHkWIvEf
— Tanay Vasu (@tanayvasu) October 6, 2022
23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी सलामी दरम्यान ऑस्ट्रेलियातल्या टी20 विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे. गेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियाला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. भारताचा वर्ल्ड कपच्या इतिहासातला पाकिस्तानकडून झालेला तो पहिलाच पराभव होता. त्याच पराभवाची परतफेड करण्याची संधी आता टीम इंडियासमोर असणार आहे.
Picture perfect 📸
— BCCI (@BCCI) October 5, 2022
Let's do this #TeamIndia@cricketworldcup, here we come ✈️ pic.twitter.com/XX7cSg3Qno
हेही वाचा - Cricket: क्रिकेटच्या मैदानातून थेट टेनिस कोर्टवर पोहोचले दोन दिग्गज, Viral फोटोमागचं कारण काय? चाहत्यांमध्ये उत्साह मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवरचा हा महामुकाबला पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. सुमारे एक लाख प्रेक्षक क्षमतेच्या या स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान संघातला हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना महिनाभर आधीच तिकिटं बुक केली आहेत. त्यामुळे रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या फौजा एमसीजीमध्ये भिडणार तेव्हा प्रेक्षकांचा भला मोठा पाठिंबा त्यांच्यासोबत असणार आहे.

)







