Home /News /sport /

VIDEO : 41 वर्षांचा जहीर खान झाला सुपरमॅन! हवेत उडी मारत घेतला शानदार कॅच

VIDEO : 41 वर्षांचा जहीर खान झाला सुपरमॅन! हवेत उडी मारत घेतला शानदार कॅच

ड सेफ्टी 2020 (Road safety world series 2020) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंडिया लिजंड्सने 7 गडी राखून विंडिज लिजंड्सला पराभूत केलं.

    मुंबई, 08 मार्च : अनअकॅडमी रोड सेफ्टी 2020 (Road safety world series 2020) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंडिया लिजंड्सने 7 गडी राखून विंडिज लिजंड्सला पराभूत केलं. शनिवारी वानखेडे मैदानावर दिग्गजांविरुद्ध पहिला सामना झाला. विंडिजने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजंड्सच्या सचिन आणि सेहवाग या सलामीच्या जोडीने 83 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सेहवागने एका बाजुने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यासोबत मोहम्मद कैफने 14 तर युवराज सिंगने नाबाद 10 धावा काढल्या. या सामन्याच्या 17व्या ओव्हरमध्ये मुनाफ पटेलच्या चेंडूवर रिकॉर्डो पावेलने फ्लिप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मिड ऑनवर उभ्या असलेल्या जहीरने शानदार टायमिंग वापरून एका हाताने जबरदस्त कॅच घेतला. सोशल मीडियावर जहीर खानच्या या शानदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वाचा-Road Safty World Series : पहिल्याच चेंडूवर सेहवागचा 'पुराना' अंदाज, पाहा VIDEO वाचा-एकटा टायगर सेहवाग विंडिज लिजंड्सवर पडला भारी, इंडिया लिजंड्सचा विजय सामन्यानंतर कर्णधार सचिनने, “जहीरला माझा आवाज ऐकू येत नव्हता, मात्र त्याने शानदार कॅच घेतला. या कॅचमुळे खरतर आम्ही सामना जिंकलो”, असे सांगितले. दरम्यान, मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात सेहवागने त्याच्या जुन्या शैलीत फटकेबाजी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत त्याने पहिल्या गड्यासाठी 83 धावांची भागिदारी केली. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. वाचा-7 वर्षांनंतर पुन्हा वानखेडेवर खेळणार सचिन! येथे पाहा सामना LIVE तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंडिया लिजंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या विंडिज लिजंडने शिवनारायन चंदरपॉलच्या अर्धशतकी आणि डॅरेन गंगाच्या फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या. चंदरपॉलने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर डॅरेन गंगाने 24 चेंडूत 32 धावांची वेगवान खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त ब्रायन लारा 17 धावा, डॅन्झा हॅट 12 धावा तर टिनो बेस्ट 11 धावांवर बाद झाले. इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून गोलंदाजी करताना जहीर खान, मुनाफ पटेल आणि प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर इरफान पठाणने एक गडी बाद केला. जहीर खानने सलामीवीर डॅरेन गंगाला बाद करून विंडीजला पहिला दणका दिला. मुनाफ पटेलनं शिवनारायण चंदरपॉलला बाद करून शेवटच्या षटकांत विंडिजच्या धावांची गती कमी केली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, Zaheer Khan

    पुढील बातम्या