मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रिषभ पंत वर्ल्ड कप पूर्वी होणार फिट? प्रकृती संदर्भात आली ही महत्वाची अपडेट

रिषभ पंत वर्ल्ड कप पूर्वी होणार फिट? प्रकृती संदर्भात आली ही महत्वाची अपडेट

पंतच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटवर दोन यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना आशा आहे की पंतच्या बाकीच्या लिगामेंटची दुखापत शस्त्रक्रिये शिवाय बरी होईल.

पंतच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटवर दोन यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना आशा आहे की पंतच्या बाकीच्या लिगामेंटची दुखापत शस्त्रक्रिये शिवाय बरी होईल.

पंतच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटवर दोन यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना आशा आहे की पंतच्या बाकीच्या लिगामेंटची दुखापत शस्त्रक्रिये शिवाय बरी होईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 जानेवारी : भारताचा स्टार युवा क्रिकेटपटू रिषभ पंत त्याच्या कार अपघातानंतर प्रकृतीशी झुंज देत आहे. 30 डिसेंबर रोजी रिषभ दिल्ली येथून त्याच्या घरी जात असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला. सुदैवाने पंत यात बचावला पण त्याला शरीराच्या विविध भागात गंभीर दुखापत झाली आहे. करिअरच्या शिखरावर असता पंतला झालेल्या अपघातामुळे त्याचे फॅन्स देखील नाराज झाले. अशावेळी तो लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा मैदानात दिसावा यासाठी त्याचे फॅन्स प्रार्थना करीत आहेत. अशातच रिषभच्या प्रकुती संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे.

रिषभ पंत सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत आहे. मीडियाला मिळलेल्या माहितीनुसार पंतच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटवर दोन यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना आशा आहे की पंतच्या बाकीच्या लिगामेंटची दुखापत शस्त्रक्रिये शिवाय बरी होईल. एवढेच नाही तर पंत यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्जही मिळण्याची शक्यता आहे.

हे ही  वाचा  : रोहित शर्मा कसा बनला 'हिटमॅन', कोणी दिलं हे नाव? वनडे सामन्यात डबल सेंचुरी सोबत आहे स्पेशल कनेक्शन

सूत्रांच्या माहितीनुसार पंतला 2 आठवडयांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो. यानंतर त्याचा रिहॅब म्हणजेच पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल. जर सर्व काही ठीक झाले तर तो दोन महिन्यांत त्याचे रिहॅब सुरू करू शकतो. असे झाल्यास पंत लवकरच मैदानावर पुनरागमन करेल. कदाचित ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तो बरा होईल आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी पुरेसा फिट होईल. मात्र, हे सर्व त्याच्या त्याच्या रिहॅब ट्रेनिंगवर अवलंबून असेल.

लिगामेंटची दुखापत ठीक व्हायला 6 महिने लागणार :

लिगामेंटची दुखापत बरी होण्यासाठी किमान 6 महिने लागतात. यानंतर पुनर्वसन आणि पंतचे ताकद प्रशिक्षण सुरू होईल. त्यानंतर दोन महिन्यांनी तो खेळू शकतो की नाही, याची चाचपणी केली जाईल. अशा दुखापतीनंतर पुनरागमन करण्यास वेळ लागतो हे पंतलाही माहीत आहे. यादरम्यान त्याचे समुपदेशनही केले जाणार आहे. त्याला क्रिकेट खेळण्यासाठी किमान 4 ते 6 महिने लागू शकतात. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे त्याला आणखी शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत त्याचा पुनरागमनाचा मार्ग थोडा सोपा होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Breaking News, Cricket, Cricket news, Rishabh pant, Team india