नवी दिल्ली, 8 एप्रिल: युवा फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) हा भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होईल, असा विश्वास अनेक दिग्गज व्यक्त करत आहेत. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि युवराज सिंह यानंही ऋषभ पंत भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतो असा विश्वास दाखवला होता. आता अजित आगरकर आणि दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन यांनीदेखील पंतचे नाव टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पंतचे नाव घेतले आहे. गुरुवारी मुंबईत लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामना खेळवण्यात आला. तत्पूर्वी, संघातील सहकारी आणि प्रशिक्षक स्टाफने कर्णधार ऋषभ पंत एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून कसा विकसित होत आहे. यासंदर्भात भाष्य केले. भारताचा पुढचा कर्णधार कोण होणार? दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकर म्हणाले, “ऋषभ पंत सामना खूप चांगला वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्याने आपला खेळ कसा विकसित केला आहे आणि एक तरुण म्हणून त्याने केलेली प्रगती पाहता वाखण्यजोगी आहे. एक युवा खेळाडू म्हणून त्याने अल्पावधीत केलेली प्रगती त्याला एक चांगली संधी मिळू शकते. ऋषभ पंतला खेळ चांगला समजतो दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन म्हणाले, “ऋषभ पंत ज्या प्रकारे प्रगती करत आहे, खेळाची परिस्थिती कशीही असली तरी त्याला खेळ समजतो. हा त्या काळातील सर्वात रोमांचक भाग आहे. अंडर-19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुल म्हणाला, “सर्व प्रथम, ऋषभ पंत खूप शांत आहे आणि त्याला खेळ चांगला समजतो. तो त्याच्या खेळाच्या कोणत्याही क्षणी त्याचा शॉट निवडू शकतो. अशा शब्दात पंतचे कौतुक करत दिग्गजांनी टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार कोण असेल याची भविष्यवाणी केली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीची कामगिरी आयपीएलच्या मागच्या हंगागात श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानं ऋषभ पंतकडं दिल्लीच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलं होतं. ऋषभपंतच्या नेतृ्त्वात दिल्लीच्या संघानं चांगली कामगिरी बजावून दाखवली होती. दरम्यान, साखळी सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करून दिल्लीनं प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. यंदाही ऋषभ पंत दिल्लीच्या संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे. या हंगामात दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतो? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.