नवी दिल्ली, 01 जानेवारी : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटे भीषण अपघात झाला. दरम्यान तो दारूच्या नशेत ओव्हरस्पीडने वाहन चालवत असल्याची अफवा वणव्यासारखी पसरत आहे. याचबरोबर शिखर धवन आणि पंत यांच्यातील चॅटचा तीन वर्षे जुना व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यावरून पंतला ओव्हरस्पीडिंगची सवय असल्याचे दिसून येते.
दरम्यान पंतच्या कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील ऑनलाइन समोर आले आहेत. ज्यामध्ये एक वाहन रस्त्यावरच्या दुभाजकाला वेगाने आदळताना दिसत आहे. मात्र, उत्तराखंड पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ते सर्व खरे नाही. पंतने ओव्हरस्पीडिंग केले नव्हते किंवा तो मद्यधुंद अवस्थेतही नव्हता असे पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
हे ही वाचा : अवघ्या 5 सेकंदात वाचला ऋषभ पंतचा जीव, जीव वाचवणाऱ्या देवदुताने सांगितली हकीकत
पोलिसांचा युक्तिवाद आहे की जर पंत मद्यधुंद अवस्थेत असेल तर तो दिल्लीपासून अपघातस्थळापर्यंत 200 किमी कसे चालवू शकेल. गाडी चालवताना पंतला डुलका लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले यातून त्याचा अपघात झाल्याची प्राथमीक माहिती असल्याचे पोलीस म्हणाले.
काय आहे प्रकरण
प्रसिद्ध विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंत च्या कारला भयंकर अपघात झाला. या अपघातात जबर जखमी झाला आहे. या घटनेनंतर BMW कार आधी डिव्हायडरवर आदळली आणि नंतर गाडीला भीषण आग लागली. पहाटेच्या सुमारास पंत उत्तराखंडहून दिल्लीला निघाला असताना गुरुकुल नरसन परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा : ऋषभ पंतची BMW कार रस्त्यावरून जळत होती, घटनास्थळाचा भयंकर LIVE VIDEO
या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने 108 क्रमांकावर फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी गाडीची आग विझवली. ऋषभ पंतला डेहराडून मॅक्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
हा अपघात नेमका कसा झाला याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जर पंत वेळीच गाडीतून बाहेर पडू शकला नसता तर मोठा अनर्थ घडला असता असंही तो म्हणाला.
पंत म्हणाला की गाडी मी स्वत: चालवत होतो. ड्राईव्ह करताना मला एक सेकंद डुलकी लागल्यासारखं झालं. काही कळण्याआत गाडी अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरवर धडकली. याच कारणामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर मी विंड स्क्रीन तोडून आपला जीव वाचवल्याचं देखील त्याने सांगितलं आहे.