जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / rishabh pant : ऋषभ पंतची BMW कार रस्त्यावरून जळत होती, घटनास्थळाचा भयंकर LIVE VIDEO

rishabh pant : ऋषभ पंतची BMW कार रस्त्यावरून जळत होती, घटनास्थळाचा भयंकर LIVE VIDEO

rishabh pant : ऋषभ पंतची BMW कार रस्त्यावरून जळत होती, घटनास्थळाचा भयंकर LIVE VIDEO

उत्तराखंडमध्ये त्याच्या BMW कारने डिव्हायडरला धडक दिली त्यानंतर कारने पेट घेतला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ Uttarakhand
  • Last Updated :

उत्तराखंड, 30 डिसेंबर : भारतीय टीमचा खेळाडू ऋषभ पंत च्या कारला भीषण अपघात झाल्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. उत्तराखंडमध्ये त्याच्या BMW कारने डिव्हायडरला धडक दिली त्यानंतर कारने पेट घेतला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली . त्यानंतर कारने पेट घेतला.

जाहिरात

डिव्हायडरला धडकल्यानंतर कारला आग लागली. अचानक झालेल्या या अपघातात पंत जखमी झाला आहे. पंत हा त्यांची बीएमडब्ल्यू कार चालवत होता. उत्तराखंडमधील रुरकीजवळ हा अपघात झाला.

या अपघातात पंत जखमी झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कारला उत्तराखंडमधील मंगलोरजवळ आज पहाटे 5.15 वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर त्यांची कार जळून खाक झाली आहे. पुढील तपासणीसाठी त्याला डेहराडूनला आणले जात आहे. (ऋषभ पंतच्या कारकिर्दीला मोठा सेटबॅक, वर्ल्ड कपमधूनही होणार पत्ता कट?) प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, पंतच्या कारला पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास अपघात झाला. कोतवाली मंगलोर क्षेत्रांतर्गत मोहम्मदपुरजवळ हा अपघात झाला. पंतला अचानक डुलकी लागली आणि कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली. पंत हा दिल्लीतील रुडकी भागात राहतोय. त्यामुळे तो घराकडे निघाला होता. त्याच दरम्यान हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिल्यानंतर कारने लगेच पेट घेतला. स्थानिकांनी धाव घेऊन पंतला कारच्या बाहेर काढलं आणि लगेच 108 रुग्णवाहिकेला फोन केला. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली. सर्वात आधी पंतला रुड़की येथील रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर आता त्याला डेहरादून इथं पाठवले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुकं साचलं होतं, त्यामुळे समोर काही दिसत नव्हतं अशातच पंतच्या कारला अपघात झाला असावा असंही सांगितलं जात आहे. (नवीन वर्षात दिसणार नवी टीम इंडिया, पंत आणि राहुलबाबत आली मोठी बातमी) विशेष म्हणजे, 9 फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी ही 4 टेस्टची सीरिज चांगल्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे. पंत या सीरिजसाठी फिट होईल अशी शक्यता कमी आहे. तर, भारतीय टेस्ट टीमसाठी फॉर्मचा विचार केला तर पंत सध्या रोहित आणि कोहलीपेक्षाही महत्त्वाचा खेळाडू असल्यानं पंतचा अपघात हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. तर दुसरीकडे, आयपीएलचा हंगाम येऊ घातला आहे. पंत दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन आहे. तो आयपीएलसाठी पूर्ण फिट होणार का याबाबत त्या फ्रँचायझीचंही आता टेन्शन वाढलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात