मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अवघ्या 5 सेकंदात वाचला ऋषभ पंतचा जीव, जीव वाचवणाऱ्या देवदुताने सांगितली हकीकत

अवघ्या 5 सेकंदात वाचला ऋषभ पंतचा जीव, जीव वाचवणाऱ्या देवदुताने सांगितली हकीकत

ऋषभ पंतला त्याच्या कारमधून बाहेर काढण्यात मदत करणारे ड्रायव्हर सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत यांचा हरियाणा परिवहन विभागाने सन्मान केला.

ऋषभ पंतला त्याच्या कारमधून बाहेर काढण्यात मदत करणारे ड्रायव्हर सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत यांचा हरियाणा परिवहन विभागाने सन्मान केला.

ऋषभ पंतला त्याच्या कारमधून बाहेर काढण्यात मदत करणारे ड्रायव्हर सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत यांचा हरियाणा परिवहन विभागाने सन्मान केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Haryana, India

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : दिल्ली-डेहराडून महामार्गावरील दुभाजकाला धडकून आग लागल्याने क्रिकेटपटू ऋषभ पंतला गंभीर जखमी झाला. दरम्यान पंतला त्याच्या कारमधून बाहेर काढण्यात मदत करणारे ड्रायव्हर सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत यांचा हरियाणा परिवहन विभागाने सन्मान केला. दरम्यान या दोघांचा राज्य सरकारकडूनही सत्कार होण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. हरियाणा रोडवेजच्या पानिपत डेपोचे महाव्यवस्थापक कुलदीप जांगरा म्हणाले ऋषभ पंतसाठी देवदूत म्हणून आलेल्या या दोन कर्मचाऱ्यांचे विशेष आभार. तसेच त्यांनी या दोघांना कौतुकपत्र आणि शिल्डही भेट दिले.

हरियाणा रोडवेज बसचा चालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत यांनी ऋषभ पंतची अनियंत्रित कार गुरुकुल नरसनजवळ दुभाजकावर आदळल्याचे दिसले. त्यानंतर लगेचच हे पंतला मदत करण्यासाठी कारच्या दिशेने धावले. या घटनेत त्यांनी जी तत्परता दाखवली त्यामुळे पंतचा जीव वाचला. या शौर्याच्या कामासाठी हरियाणा डेपोने त्यांचा सन्मान केला आहे.

हे ही वाचा : अपघातानंतर ऋषभ पंत याला लुटलं का? एसएसपींनी सांगितली संपूर्ण हकीकत

क्रिकेटपटू ऋषभ पंतला वाचवणारे बस कंडक्टर परमजीत म्हणाले की, आम्ही ऋषभ पंतला बाहेर काढताच कारला आग लागली आणि 5 ते 7 सेकंदात कार जळून खाक झाली. त्याच्या पाठीवर खूप जखमा होत्या. आम्ही त्याच्याबद्दल विचारले आणि तेव्हाच तो म्हणाला की तो भारतीय संघाचा क्रिकेटर आहे.

ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांनीही माणुसकीचा आदर्श ठेवल्याचेही जांगरा म्हणाले. त्यांनी सांगितले की पानिपतच्या दिशेने जाणारी बस हरिद्वारहून पहाटे 4.25 वाजता निघाली आणि सुमारे तासाभरानंतर अपघातस्थळी पोहोचली. तर हरियाणाचे परिवहन मंत्री मूलचंद शर्मा म्हणाले की, कुमार आणि परमजीत या दोघांनी मानवतेचे दर्शन घडवले आहे. यामुळे पंत बचावला आहे.

हे ही वाचा : ऋषभ पंत भविष्यात पुनरागमन करणार का? मेंदू, मणक्याचा MRI रिपोर्ट समोर, मोठी हेल्थ अपडेट

हरियाणाचे परिवहन विभागाचे प्रधान सचिव नवदीप विर्क यांनीही कुमार आणि परमजीतचे कौतुक केले. उल्लेखनीय म्हणजे, शुक्रवारी सकाळी दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची आलिशान कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि आग लागल्याने स्टार क्रिकेटर ऋषभ पंत थोडक्यात बचावला.

First published:

Tags: Accident, Major accident, Rishabh pant