जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अपघातानंतर ऋषभ पंत याला लुटलं का? एसएसपींनी सांगितली संपूर्ण हकीकत

अपघातानंतर ऋषभ पंत याला लुटलं का? एसएसपींनी सांगितली संपूर्ण हकीकत

अपघातानंतर ऋषभ पंत याला लुटलं का?

अपघातानंतर ऋषभ पंत याला लुटलं का?

Rishabh Pant News: क्रिकेटपटू ऋषभ पंत शुक्रवारी रस्ता अपघाताचा बळी ठरला. या अपघातात त्यांची कार जळून खाक झाली. दरम्यान, काही लोकांनी त्याचे सामान लुटल्याची अफवा पसरली.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

डेहराडून, 30 डिसेंबर : क्रिकेटपटू ऋषभ पंत शुक्रवारी एका भीषण अपघाताला बळी पडला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याची कार दिल्ली-डेहराडून महामार्गावर दुभाजकाला धडकली. धडकल्यानंतर ऋषभ खिडकीची काच तोडून बाहेर आला. त्याचवेळी, कारने पेट घेतला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, अपघातानंतर काही लोकांनी त्याच्याकडील सामान लुटल्याची अफवा पसरली. पोलिसांनी या अफवाचे खंडन केले आहे. पंतला वेळीच मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तरीही त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, काही चॅनेल्स आणि पोर्टलवर ऋषभचे काही सामान लुटण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही चुकीची माहिती आहे. एसपी देहत (रुरकी) यांच्या म्हणण्यानुसार, ऋषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्याकडून एक ब्रेसलेट, चेन आणि काही रोख रक्कम सापडली आहे. सर्व काही त्याच्या आईच्या स्वाधीन केले आहे. वाचा - विचित्र आहे डुलकीचे शास्त्र! तरुणांना जास्त येते तर वृद्ध लोक टिकून राहतात; टाळण्यासाठी प्रभाव उपाय हरियाणा रोडवेज बसचालक पहिल्यांदा धावून आला अपघातानंतर हरियाणा रोडवेज बसचा चालक सुशील कुमार सर्वात आधी ऋषभच्या मदतीला पोहोचला. सुशीलने त्याला पेटलेल्या गाडीतून काढून हॉस्पिटलमध्ये नेले. अपघाताबाबत हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत हा अपघात हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर येथे पहाटे साडेपाच वाजता झाला. त्याला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळला. यानंतर पंत याला रुरकी येथील सक्षम रुग्णालयात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात पाठवण्यात आले.

News18लोकमत
News18लोकमत

आईला भेटायला जात असताना अपघात एसएसपीने सांगितले की, पंतच्या डोक्याला, पाठीवर आणि पायाला जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताची माहिती ऋषभ पंतच्या आईला देण्यात आली आहे. दरम्यान, पंत याच्या डोक्याला आणि गुडघ्याला दुखापत झाल्याचे आयसीयूमध्ये उपचार देतअसलेले डॉ. सुशील नागर यांनी सांगितले. रुग्णालयात आणले तेव्हा तो पूर्णपणे शुद्धीवर होता. पंतने डॉक्टरांना सांगितले की, त्याला घरी जाऊन आईला सरप्राईज करायचे होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात