जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऋषभ पंत भविष्यात पुनरागमन करणार का? मेंदू, मणक्याचा MRI रिपोर्ट समोर, मोठी हेल्थ अपडेट

ऋषभ पंत भविष्यात पुनरागमन करणार का? मेंदू, मणक्याचा MRI रिपोर्ट समोर, मोठी हेल्थ अपडेट

ऋषभ पंत भविष्यात पुनरागमन करणार का?

ऋषभ पंत भविष्यात पुनरागमन करणार का?

Rishabh Pant Latest Health update: रस्ता अपघातात जखमी झालेला भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतवर डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, त्यांच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : दिल्ली-डेहराडून महामार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीराच्या अनेक भागात जखमा होत्या. प्राथमिक उपचारानंतर त्याच्यावर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या क्रिकेटपटूच्या आरोग्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. दरम्यान, त्याच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याचा मेंदू आणि पाठीचा कणा यांचा एमआरआय स्कॅनचा अहवाल नॉर्मल आला आहे. म्हणजेच मेंदूला आणि पाठीच्या कण्याला कोणतीही खोल दुखापत झाली नाही. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, पंतला मेंदू आणि पाठीच्या कण्याला काही दुखापत झाली आहे की नाही हे शोधण्यासाठी त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. पण, अहवालात सर्व काही सामान्य झाले आहे. रुरकीजवळ झालेल्या या अपघातात पंतच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. त्याच्या जखमा आणि ओरखडे दुरुस्त करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी देखील करण्यात आल्याची माहिती आहे. पंतच्या घोट्याचा आणि गुडघ्याचा एमआरआय पुढे ढकलला वेदना आणि सूज यामुळे पंतच्या घोट्याचे आणि गुडघ्याचे एमआरआय स्कॅन एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना यष्टीरक्षकाच्या उजव्या गुडघ्यात लिगामेंटला दुखापत झाल्याचा संशय आहे. म्हणूनच गुडघ्याच्या वर स्प्लिंटिंग केले गेले आहे. त्याचबरोबर त्याच्या उजव्या घोट्याच्या लिगामेंटला दुखापत झाण्याची शक्यता आहे. सध्या पंत याची प्रकृती स्थिर असून तो शुद्धीवर असून बोलत आहे. वाचा - अपघातानंतर ऋषभ पंत याला लुटलं का? एसएसपींनी सांगितली संपूर्ण हकीकत कसा झाला अपघात? पंत आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात होता. शुक्रवारी सकाळी दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ दुभाजकाला धडकून त्याची कार उलटली. यानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने कारला आग लागण्यापूर्वीच पंत खिडकी तोडून बाहेर आला होता. यानंतर, त्याला स्थानिक सक्षम मल्टीस्पेशालिटी आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, तेथून प्राथमिक उपचारानंतर त्यांना डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

News18लोकमत
News18लोकमत

हरियाणा रोडवेज बसचालक पहिल्यांदा धावून आला अपघातानंतर हरियाणा रोडवेज बसचा चालक सुशील कुमार सर्वात आधी ऋषभच्या मदतीला पोहोचला. सुशीलने त्याला पेटलेल्या गाडीतून काढून हॉस्पिटलमध्ये नेले. अपघाताबाबत हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत हा अपघात हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर येथे पहाटे साडेपाच वाजता झाला. त्याला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळला. यानंतर पंत याला रुरकी येथील सक्षम रुग्णालयात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात पाठवण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात