क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा घेणार क्रिकेटमधून ब्रेक!

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा घेणार क्रिकेटमधून ब्रेक!

भारतीय एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) 2019 हे वर्ष खुप खास राहिले आहे.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर : भारतीय एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) 2019 हे वर्ष खुप खास राहिले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मानं बॅटनं तुफान खेळी केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितनं 159 तर दुसऱ्या सामन्यात 63 धावांची खेळी केली. मात्र फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मानं क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध राहणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यात 5 जानेवारीपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.

वाचा-हिटमॅनची वादळी खेळी! मोडला 22 वर्षांपूर्वीचा दिग्गज फलंदाजाचा विक्रम

या कारणामुळं रोहितनं घेतला विश्रांतीचा निर्णय

रोहित शर्मा 2019मध्ये वर्षभर क्रिकेट खेळत आहे. टी-20, एकदिवसीय आणि कसोटी तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहितनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, रोहित शर्मा 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नाही आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं भारतीय संघ तयारी करत आहे. त्यामुळं निवड समिती फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंनी विश्रांती देण्याचा विचार करणार नाही. मात्र रोहित शर्मा गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळं बोर्डच्या वतीनं श्रीलंका दौऱ्यात रोहितला विश्रांती दिली जाईल’.

वाचा-विराटनं जिंकली सर्वांची मनं, अस्सल मराठी ट्वीट करत दिली शार्दुल ठाकूरला शाबासकी!

असा आहे भारत-श्रीलंका दौरा

श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघ तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका 5 जानेवारीपासून गुवाहाटी येथून सुरू होईल. त्यानंतर 7 जानेवारी रोजी इंदूरमध्ये दुसरा सामना होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना पुण्यात होणार आहे. त्यामुळं या दौऱ्यातून विश्रांती घेतल्यानंतर रोहित त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या मालिकेत पुनरागमन करू शकतो. दुसरीकडे सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जखमी झालेला शिखर धवन फिट झाला आहे, त्यामुळं तो संघात पुनरागमन करू शकतो. तर, केएल राहुलची जागा संघात निश्चित झाली आहे.

वाचा-‘धोनीनं नाही तर आता पंतनं निवृत्ती घ्यावी’, मोक्याची क्षणी बाद झाला ऋषभ

रोहितनं मोडला 22 वर्षांपूर्वीचा विक्रम

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या तिसऱ्या निर्णायक सामन्यात रोहित शर्मानं दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याचा 22 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात जेसन होल्डरच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर श्रीलंकेच्या जयसूर्याच्या सलामीवीर म्हणून एका वर्षात 2 हजार 387 धावांची नोंद केली. 1997मध्ये जयसूर्यानं ही अद्भुत कामगिरी केली होती. गेल्या 22 वर्षांत कोणत्याही सलामीवीरने वर्षात इतक्या धावा केलेल्या नाहीत. याचबरोबर या सामन्यात रोहितनं 52 चेंडूत आपले अर्धशतकी पूर्ण केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 01:10 PM IST

ताज्या बातम्या