कटक, 23 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजनं 316 धावांचे आव्हान विराटसेनेसमोर ठेवले. विराट कोहलीच्या 85 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं हा सामना 4 विकेटनं जिंकला. तिसऱ्या सामन्यात विराट आणि जडेजा यांच्यातील 58 धावांची भागीदारी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली. तर, शार्दुल ठाकुरनं 17 धावा केल्या तर जडेजानं 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत सामना जिंकला. तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 316 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी करत दोघांनी अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा 63 धावा करत तर बाद झाला. तर, केएल राहुलनं 77 धावांची खेळी केली. दोन्हीही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाजांवर फलंदाजीची मदार होती. मात्र श्रेयस अय्यर लगेगच 7 धावा करत बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र पंतने पुन्हा एकदा सगळ्यांना निराश केले. याआधी पंतने 3 झेल सोडल्यामुळं भारताला जास्त धावा मोजाव्या लागल्या. त्यानंतर पंतकडे संघासाठी विजयी खेळी करत स्वत:ला सिध्द करण्याची संधी होती. मात्र पंतने ही संधी गमावली आणि किमो पॉलच्या गोलंदाजीवर 35व्या ओव्हरमध्ये 7 धावांवर बोल्ड झाला.
यानंतर पंतला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येत आहे. काही नेटकऱ्यांनी धोनीच्या आधी पंतला निवृत्त करा, असा सल्ला देण्यात आला. तर, काहींनी विराट कोहली आणि बीसीसीआयला पंतला आणखी एक संधी दिल्यामुळे ट्रोल केले.
Hey @RishabhPant17, my mom treats (talks) about you like her own son... "Hoshiyar toh bahut hai, buss mann lagakar nahi padta" types 😆 #RishabhPant
— Sushil Kothari (@sushilkothari) December 22, 2019
याआधी पंतने चेन्नईच्या धीम्या खेळपट्टीवर अर्धशतक ठोकल्यानंतर विशाखापट्टणममध्ये अवघ्या 19 चेंडूत 39 धावा केल्या. विकेटकीपर म्हणून पंतची खराब कामगिरी कटक एकदिवसीय सामन्यात पंतने 16 व्या षटकात पहिला झेल घेतला. कुलदीप यादवच्या दुसर्या बॉलवर रॉवस्टन चेस चुकला आणि चेंडूने त्याच्या फलंदाजाची बाह्य धार घेतली पण पंतला हा झेल पकडता आला नाही. पंत पंतच्या ग्लोव्हजवरून चेंडू सरकला. यानंतर पंतने एक नव्हे तर जबरदस्त फॉर्ममध्ये धावणार्या शिमरॉन हेटमीयरचे दोन झेल सोडले. 25व्या षटकात, हेटमीयर जडेजाच्या दुसर्या लेगवर लेग साइडकडे खेळला. चेंडू त्याच्या बॅटने फटका मारला, पण झेल चुकला. यानंतर, पुढच्या चेंडूवर हेटमीयरने पुन्हा एकदा शॉट खेळला आणि चेंडू त्याच्या बॅटच्या अंतर्गत काठावर आदळला, पंतला पुन्हा झेल पकडता आला नाही. मात्र, हेटमायरला 37 धावांवर नवदीप सैनीनं बाद केले.

)







