मुंबई, 23 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील निर्णायक एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं 85 धावांची खेळी केली. कोहलीच्या या खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना 4 विकेटनं जिंकला. त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका 2-1नं आपल्या खिशात घातली. कर्णधार विराट कोहली क्रिकेटसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. मागच्या काही काळापासून वेस्ट इंडिज मालिकेत बीझी असेलेला विराट आता रिलॅक्स मूडमध्ये आहे. विराटनं आज सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे आणि ती सुद्धा चक्क मराठीत. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विराटनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर नुकताच क्रिकेटर शार्दुल ठाकूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना विराटनं लिहिलं, ‘तुला मानलं रे ठाकूर.’ विराटचं मराठी कॅप्शन सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या कॅप्शनसोबतच त्यांनं चाहत्यांची मनंही जिंकली आहेत. काहींना विराटला मराठी येते याबद्दल आश्चर्य वाटत आहे. अनेकांनी त्याच्या या कॅप्शनचं कौतुक केलं आहे. विराटनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये विराट आणि शार्दुल रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. हिटमॅनची वादळी खेळी! मोडला 22 वर्षांपूर्वीचा दिग्गज फलंदाजाचा विक्रम
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं टी-20 मालिकाही 2-1च्या फरकानं जिंकली होती. तिसऱ्या सामन्यात विराट आणि जडेजा यांच्यातील 58 धावांची भागीदारी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली. तर, शार्दुल ठाकुरनं 17 धावा केल्या तर जडेजानं 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत सामना जिंकला. तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 316 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी करत दोघांनी अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा 63 धावा करत तर बाद झाला. तर, केएल राहुलनं 77 धावांची खेळी केली. दोन्हीही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाजांवर फलंदाजीची मदार होती. मात्र श्रेयस अय्यर लगेगच 7 धावा करत बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र पंतने पुन्हा एकदा सगळ्यांना निराश केले. त्यानंतर जडेजा आणि विराटनं महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सचे पैसे वसुल! IPLआधीच ‘या’ खेळाडूनं केल्या 35 चेंडूत 94 धावा याआधी टीम इंडियाचे ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि पोलार्डच्या (74) आतषबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं 50 ओव्हरमध्ये 315 धावा केल्या. पोलार्डनं या सामन्यात 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजकडून निकोलस पुरन आणि कॅरन पोलार्ड यांनी शतकी भागीदारी केली. 48व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरनं निकोलस पुरनला 89 धावांवर बाद केले. याशिवाय सलामीवीर शाई होप आणि इविन लुईस यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दुसरीकडे भारताकडून पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनी 2 तर मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. पंत पुढे खेळाडूंनी टेकले हात! सलग तीन कॅच सोडण्याची लाजीरवाणी कामगिरी

)







