मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /VIDEO : लॉकडाऊनमध्ये बॅट सोडून रवींद्र जडेजानं हातात घेतली तलवार आणि...

VIDEO : लॉकडाऊनमध्ये बॅट सोडून रवींद्र जडेजानं हातात घेतली तलवार आणि...

जडेजा नक्की कसली तयारी करतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यानं अपलोड केलेला व्हिडीओ पाहा.

जडेजा नक्की कसली तयारी करतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यानं अपलोड केलेला व्हिडीओ पाहा.

जडेजा नक्की कसली तयारी करतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यानं अपलोड केलेला व्हिडीओ पाहा.

नवी दिल्ली, 13 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परिणामी सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहे. क्रिकेटचे सामनेही रद्द झाले आहे. त्यामुळं सर्व क्रिकेटपटू सध्या घरांमध्ये कैद आहेत. यातच भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं चक्क बॅट सोडून हातात तलवार घेतली. जडेजा नक्की कसली तयारी करतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यानं अपलोड केलेला व्हिडीओ पाहा.

जडेजानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करत, आपली तलवारबाजी दाखवली आहे. जडेजा नेहमीच मैदानावर बॅट हवेत फिरवतो, त्याची ही स्टाइल क्रिकेट जगतात फारच लोकप्रिय आहे. मात्र पहिल्यांदाच जडेजाने हातात तलवार घेत आपली कला दाखवली.

कोरोनामुळे सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांवर बंदी आहे. अशा परिस्थितीत जडेजाला मैदानावर तलवारबाजी करण्याची संधी मिळत नाही आहे. म्हणूनच, आपल्या फार्म हाऊसवरच जडेजा तलवारबाजी करताना दिसत आहे. रविवारी जाडेजाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत, 'तलवार आपली चमक गमावू शकतो मात्र आपल्या मालकाचा अपमान करणार नाही. राजपूत मुलगा', असे कॅप्शन लिहिले आहे.

वाचा-रामायणातील 'त्या' प्रसंगातून सेहवागला मिळाली बॅटिंगची प्रेरणा?

वाचा-अभिमानास्पद! भारतातील प्रसिद्ध फूटबॉलपटू करतोय COVID-19 हेल्पलाइन सेंटरमध्ये काम

वॉर्नरने केली होती जडेजाची कॉपी

ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वी आयपीएलचा एक थ्रोबॅक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये जडेजाप्रमाणे तो बॅट हवेत फिरवताना दिसत आहे. यावेळी वॉर्नरने चाहत्यांना जडेजासारखी तलवार बाजी केली का? असा सवाल विचारला.

वाचा-लॉकडाऊनमुळे क्रिकेटला मिस करताय? मग हे फोटो एकदा पाहाच

जुलैनंतर आयपीएलबाबत निर्णय होणार?

सीएनबीसी टीव्ही-18ला बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै अखेरीस रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन केले जाऊ शकते. यासाठी बीसीसीआयच्या वतीने तारखा शोधण्याचे काम सुरू आहे. यानुसार जुलै किंवा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित केला जाऊ शकतो. दरम्यान, जर आयपीएल रद्द करण्यात आली तर बीसीसीआयला 7 हजार कोटी ते 47 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

First published:

Tags: Cricket