जामनगर, 26 नोव्हेंबर: आशिया कप स्पर्धेपासून टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा संघाबाहेर आहे. आशिया कपच्या साखळी फेरीदरम्यान जाडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे त्याला टी20 वर्ल्ड कपलाही मुकावं लागलं. पण आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीआयनं जाडेजाचा वन डे आणि कसोटी संघात समावेश केला होता. मात्र पूर्णपणे फिट न झाल्यानं बांगलादेश दौऱ्यातल्या वन डे मालिकेतून जाडेजाला माघार घ्यावी लागली. इतकच नव्हे तर त्यानंतरच्या कसोटी मालिकेतूनही तो खेळण्याची शक्यता कमी आहे. पण असं असलं तरी जाडेजा क्रिकेट सोडून सध्या वेगळ्याच कामात व्यस्त असल्याचं दिसतंय. पत्नीसाठी जाडेजाचा रोड शो रवींद्र जाडेजा गुजरातच्या जामनगरमधला. सध्या गुजराममध्ये निवडणुकीचे वारे वाहतायत आणि याच निवडणुकीत जाडेजाची पत्नी रिवाबा जामनगर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतेय. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी जाडेजानं सध्या रोड शो करण्यात व्यस्त आहे. काल जामनगरमध्ये जाडेजाच्या रोड शोला तुफान गर्दीही पाहायला मिळाली.
Gujarat | Cricketer Ravindra Jadeja today campaigned for his wife & BJP candidate from Jamnagar North, Rivaba Jadeja, in Khambhalia, Jamnagar pic.twitter.com/z8iyQSnhEB
— ANI (@ANI) November 25, 2022
हेही वाचा - BCCI: आधी सिलेक्टर्स ‘आऊट’, आता बीसीसीआयकडून आणखी एक ‘विकेट’ पक्की; पण कुणाची? प्रचारादरम्यान अमित शाहांची भेट दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान जाडेजानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्यानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचा फोटो पोस्ट केला होता.
Pleasure meeting you sir @AmitShah #jamnagar pic.twitter.com/xqfcHCMtFk
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 21, 2022
1 आणि 5 डिसेंबरला मतदान बीजेपीनं जाडेजाची पत्ती रिवाबाला जामनगरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघाचं तिकीट दिलं आहे. गुजरातमध्ये 182 जागांसाठी दोन टप्प्यात म्हणजेच 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.