IPL 2020 : अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाब देणार डच्चू? ‘या’ खेळाडूकडे जाणार कर्णधारपद!

IPL 2020 : अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाब देणार डच्चू? ‘या’ खेळाडूकडे जाणार कर्णधारपद!

IPL 2020 : भारताचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

पंजाब, 24 ऑगस्ट : भारताचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये अश्विन खेळत असलेल्या संघाकडूनच त्याला धक्का मिळू शकते. सध्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधार अश्विनकडे आहे. मात्र पुढच्या हंगामात अश्विनचा डच्चू मिळू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार पंजाबनं संघात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं अश्विनचा बळी जाण्याची शक्यता जास्त आहे.

मुंबई मिररनं दिलेल्या माहितीनुसार, अश्विनला दुसऱ्या संघात पाठवण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहेत. अश्विन संघात राहणार की नाही याबाबत या आठवड्यात निर्णय होऊ शकतो. गेल्या दोन हंगामांपासून पंजाब संघाचे नेतृत्वा आर. अश्विनकडे आहे. दरम्यान दोन्ही पर्वात पंजाब संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळं अश्विनला डच्चू मिळू शकतो. तसेच, अश्विनला भारतीय संघातही स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी फिरकीपटू रविंद्र जडेजाला वेस्ट इंडिज दौऱ्यात स्थान मिळाले.

दिल्ली किंवा राजस्थानमध्ये मिळू शकते अश्विनला जागा

रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स किंवा राजस्थान रॉयल्स या दोन संघापैकी एका संघात अश्विनला स्थान मिळू शकते. राजस्थानचा संघ कर्नाटकचा फिरकीपटू कृष्णप्पा गौतमला संघात न घेता अश्विनला जागा देऊ शकतात. तसेच, दिल्लीमधून त्याला संघात संधी मिळू शकते. दरम्यान दिल्ली संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असल्यामुळं अश्विनला कर्णधारपद मिळणार नाही.

वाचा-शटल क्वीनची दमदार खेळी! सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये एण्ट्री

केएल राहुल होऊ शकतो पंजाबचा कर्णधार

बातम्यानुसार पंजाब संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे दिले जाऊ शकता. केएल राहुल गेले दोन हंगाम संघासोबत आहे. त्यामुळं अश्विनकडून कर्णधारपद काढून घेतल्यास राहुल कर्णधार होऊ शकते. गेल्या हंगामात केएल राहुलनं चांगली फलंदाजी केली होती.

वाचा-'या' एका कारणामुळं सेहवागसाठी अरुण जेटली ठरले हिरो!

पंजाबला नव्या कोचची प्रतिक्षा

रविचंद्रन अश्विननं पंजाबकडून 28 सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 25 विकेट घेतल्या आहेत. याआधी अश्विन चेन्नई सुपरकिंग्ज आणि पुणे रायझिंग सुपरजायंट्स संघाकडून खेळला होता. मात्र 2018मध्ये पंजाब संघानं अश्विनला मोठी बोली लावत विकत घेतला. दरम्यान आता पंजाबला नव्या कोचची प्रतिक्षा आगे. माईक हेसननं राजीनामा दिल्यानंतर डॅरेन लॅहमॅन किंवा जॉर्ज बेली संघाचे प्रशिक्षक होऊ शकतात.

वाचा-‘मी माझा बाप गमावला’, अरुण जेटलींच्या निधनानंतर भारतीय क्रिकेटरला भावना अनावर

VIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 04:51 PM IST

ताज्या बातम्या