नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : प्रदीर्घ काळापासून आजारी असलेले अरुण जेटली यांनी आज अखेरचा श्वास घेतला. दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी आपले प्राण सोडले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजकारणाबरोबरच अरूण जेटली यांचे खेळासोबतही खुप जवळचे संबंध होते. जेटली 1999 ते 2013 पर्यंत दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यामुळं क्रिकेट आणि त्यांचा खुप जवळचा संबंध होता.
अरुण जेटली आणि क्रिकेट यांचे फार जुने नाते आहे. दिल्ली डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष असताना त्यांन गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग सारख्या खेळाडूंना भारतीय संघासाठी खेळण्याची संधी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखालीत गंभीर आणि सेहवागनं भारतीय संघाच पदार्पण केले होते. सेहवाग आणि जेटली यांचे फार जुने संबंध होते. मात्र, एक काळ असा होतो जेव्हा डीडीसीएल आणि सेहवाग यांच्यातील आपसिक वादामुळं सेहवागनं दिल्लीकडून न खेळण्याचा निर्णय घेतला होता. सेहवागनं दिल्ली सोडून हरियाणातून खेळण्याता निर्णय घेतला होता. त्यावेळी सेहवागनं जेटली यांच्यासोबत असलेल्या चांगल्या संबंधांमुळं, हरियाणाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला.
जेटली यांचे गौतम गंभीर, आशिष नेहरा आणि सेहवाग यांसारख्या खेळाडूंशी नेहमीच तांगले संबंध राहिले आहे. त्यांच्या निधनानंतर सेहवागनं ट्वीट करत दु:ख व्यक्त केले.
जेटलींमुळं क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली
अरुण जेटलींमुळं माझ्यासारख्या खेळाडूंना भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी नेहमीच खेळाडूंचे म्हणणे एकून घेतले. त्रास असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न केला. माझे त्यांच्या सोबत खुप चांगले संबंध होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
वाचा-‘मी माझा बाप गमावला’, अरुण जेटलींच्या निधनानंतर भारतीय क्रिकेटरला भावना अनावर
But under his leadership at the DDCA, many players including me got a chance to represent India. He listened to needs of the players & was a problem solver. Personally shared a very beautiful relationship with him. My thoughts & prayers are with his family & loved ones. Om Shanti https://t.co/Kl4NpprR6W
— Virender Sehwag (@virendersehwag) August 24, 2019
वाचा-जेटलींनी आजारी असताना कलम 370 च्या ऐतिहासिक निर्णयावर लिहला होता शेवटचा ब्लॉग
गौतम गंभीरही झाला भावूक
निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. यात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले. गंभीरनं, “वडिल तुम्हाला बोलायला शिकवतात, मात्र तुमच्या आयुष्यात जी व्यक्त पित्या समान असते ती तुम्हाला जीवनाच कसे वागायचे हे शिकवते. वडिल तुम्हाला नाव देतात, पण पित्या समान व्यक्ती तुम्हाला ओळख देतात. आज मी माझ्या पित्या समान व्यक्तीला गमावले. माझ्या शरीरातील एक भाग आज निखळला. सर, तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, असे ट्वीट केले.
वाचा-LIVE UPDATE:मोदी सरकारचे संकटमोचक अरुण जेटली कालवश, एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्विराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Virender sehwag