जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Badminton Championships 2019 : शटल क्वीनची दमदार खेळी! सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये एण्ट्री

World Badminton Championships 2019 : शटल क्वीनची दमदार खेळी! सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये एण्ट्री

World Badminton Championships 2019 : शटल क्वीनची दमदार खेळी! सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये एण्ट्री

world badminton championship : सिंधूनं 40 मिनिटे चाललेल्या खेळात फेईचा 21-7,21-14नं पराभव केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    बासेल, 24 ऑगस्ट : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं सलग तिसऱ्यांदा World Badminton Championshipsच्या फायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात चीनच्या चेन यू फेई (Chen yu Fei)चा सलग सेटमध्ये पराभव करत फायनलमध्ये दणक्यात एण्ट्री घेतली. सिंधूनं 40 मिनिटे चाललेल्या खेळात फेईचा 21-7,21-14नं पराभव केला. पहिल्या गेमपासूनच सिंधूनं आघाडी मिळवली होती. त्यामुळं चेन प्रचंड दबावात खेळत होती. चेनचा या एका गोष्टीचा फायदा सिंधूनं घेतला आणि ब्रेक पर्यंत 11-3ची आघाडी मिळवली. ब्रेकनंतर चेन क्रोस कोर्ट खेळत गुण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचे प्रयत्न सिंधूच्या खेळीसमोर फोल ठरले. सिंधूनं दमदार स्मॅश आणि कोर्ट कव्हरेजच्या जोरावर 15 मिनिटांचा पहिला गेम 21-7नं आपल्या नावावर केला. दोन वर्षांपासून हुकले आहे सिंधूचे सुवर्ण सिंधूनं सलग तिसऱ्यांदा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, आतापर्यंत एकदाही सिंधूला विजय मिळवता आलेला नाही. या विजयासह यिंग विरोधात सिंधूचा रेकॉर्ड आता 5-10 झाला आहे.

    जाहिरात

    सायना नेहवाल स्पर्धेबाहेर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकणारी सायना नेहवाल विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेबाहेर गेली आहे. पूर्व उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टनं सायनाचा पराभव केला. एक तास 12 मिनिटे चालल्या या सामन्यात 15 -21, 27-25, 21-12 अशा तीन सेटमध्ये सायनाला पराभव स्विकारावा लागला. साई प्रणितनं मिळवले सेमीफायनलमध्ये स्थान भारतीय पुरुष संघाचा बॅडमिंटनपटू साई प्रणितनं वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यानं इंडोनेशियाच्या जॉनाटन क्रिस्टीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. प्रणितनं क्रिस्टीला 24-22, 21-14नं मात दिली. हा सामना तब्बल 51 मिनिटांचा होता. यामुळं भारताचा 36 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. VIDEO: ‘मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही’

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात