मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPLमध्ये 7 वर्षे एकत्र खेळूनही मलिंगाने काहीच नाही शिकवलं, बुमराहचा धक्कादायक खुलासा

IPLमध्ये 7 वर्षे एकत्र खेळूनही मलिंगाने काहीच नाही शिकवलं, बुमराहचा धक्कादायक खुलासा

यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाबाबत भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचे मोठा खुलासा.

यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाबाबत भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचे मोठा खुलासा.

यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाबाबत भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचे मोठा खुलासा.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 03 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव समोर येताच डोळ्यासमोर येतो तो त्याचा घातक यॉर्कर. आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर आजही बुमराहचे नाव जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये घेतले जाते. त्याच्या गोलंदाजीच्या अक्शनमुळे त्याच्यावर अनेकदा टीका झाली असली तरी, फलंदाजांसाठी ती घातक आहे. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघात पुन्हा पुनरागमन करणाऱ्या बुमराहनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानं नुकतेच एका मुलाखतीत आपल्या यॉर्कर मागचे रहस्य सांगितले.

जसप्रीम बुमराह आयपीएलमध्ये 2013पासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. याच संघानं सर्वोधिक म्हणजे 4 विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. कारण या संघात लसिथ मलिंगा आणि जसप्रीम बुमराह असे दोन दिग्गज गोलंदाज आहेत. त्यामुळे बुमराहच्या गोलंदाजीमध्ये मलिंगाचे योगदान असेल असे सगळ्यांना वाटते मात्र बुमराहनं याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. बुमराहनं मलिंगाने त्याला कधीच काहीच नाही शिकवले आहे, असे सांगितले आहे.

वाचा-भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूला दणका, एका वर्षाची बंदी

‘मलिंगाकडून यॉर्कर शिकलो नाही’

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराहनं, 'बहुतेक लोकांना असे वाटते की मला लसिथ मलिंगाने यॉर्करने शिकवले होते, जे खरे नाही. त्यांनी मला काहीही शिकवले नाही. मी त्यांच्याकडून फक्त एक गोष्ट शिकली आहे आणि ते फक्त डोक्याबाबत. वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना कसा करावा. फलंदाजाची योजना कशी करावी आणि रागावर नियंत्रण कसे ठेवावे’, असे सांगितले. तर, यॉर्कर विषयी बुमराह म्हणाला, 'मी टीव्हीवर क्रिकेट बघायचो. जेव्हा जेव्हा गोलंदाज विकेट घेतात किंवा बॉल वेगात फेकत असत तेव्हा मला त्याचा खूप आनंद घ्यायचा. मला वाटले की हेच करायचे आहे. मी माझ्या मनातला ब्रेट ली मानला. कधी तो अशी गोलंदाजी करतो तर कधी काहीतरी वेगळं करतो. मी माझ्या आदर्श गोलंदाजांची कॉपी करायचो’. असे सांगत मलिंगाकडून गोलंदाजी न शिकल्याचे यावेळी बुमराहनं स्पष्ट केले.

वाचा-VIDEO - हार्दिकचं ठरलं! 'एंगेज्ड' झाल्याचं 'साऱ्या हिंदुस्तान'ला असं कळवलं

रस्त्यावर करायचा यॉर्करचा सराव

जसप्रीत बुमराहने सांगितले की त्यांनी स्ट्रीट क्रिकेटमध्ये यॉर्करला कसे तयार केले. तो म्हणाला की, 'जर आमच्याकडे रबरचा बॉल असेल तर ते खूप कठीण होते आणि त्यावर शिवण देखील कोरलेले होते. हा चेंडू खूप स्विंग करायचा. आम्ही खेळपट्टीवर खेळलो नाही म्हणून शिवण हालचाल झाली नाही आणि विकेटच्या मागे झेल घेण्याची शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत मी शक्य तितक्या फलंदाजांना चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला विकेट हवे असेल तर तुम्हाला यॉर्कर फेकावे लागले. माझा असा विश्वास आहे की या अनुभवामुळे मला समजूतदारपणा मिळाला. '

वाचा-VIDEO : हा छोटा बघा हाताच्या मदतीने काढतो धावा, साक्षात सचिनही झाला थक्क!

First published: