नवी दिल्ली, 2 जानेवारी : भारतातील अनेक क्रीडा प्रकारांमध्ये वयचोरीच्या प्रकारणांवरून खळबळ उडाली आहे. क्रिकेटसह इतरही क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू वयचोरी करत असल्याचं समोर येत आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचं समालोचन करताना भारताचा माजी क्रिकेटपटू आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने थेटपणे याविषयी भाष्य केलं होतं. ‘भारतात सर्वच खेळाडू वयचोरी करत असतात. तुम्ही तुमच्या काळात असं केलं असेल,’ असं एका खेळाडूला उद्देशून वीरेंद्र सेहवाग म्हणाला होता. अशीच वयचोरी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला आता दणका बसला आहे. मागील अंडर-19 वर्ल्डकप (Under-19 World Cup)च्या फायनलमध्ये तडाखेबंद शतक झळकावून भारताला विजय मिळवून देणाऱ्या सलामीवीर मनजोत कालरा (Manjot Kalra)या क्रिकेटपटूचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. मनजोत कालरा याला अंडर-16 आणि अंडर-19 मध्ये खेळताना कथित वयचोरी केल्याप्रकरणी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन (DDCA) ने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy)खेळण्यापासून एका वर्षाची बंदी घातली आहे. हार्दिकचं ठरलं! ग्लॅमरस गर्लफ्रेंडबरोबर ‘एंगेज्ड’ झाल्याचं ‘साऱ्या हिंदुस्तान’ला कळवलं शिखर धवनची घेणार होता जागा मनजोत कालरा याच्यावर रणजी क्रिकेटमधून 1 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर वयोगट स्पर्धांमध्ये खेळण्यापासून 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. BCCI रेकॉर्ड्सनुसार मनजोत कालरा याचं वय 20 वर्ष 351 दिवस इतकं आहे. कालरा मागील आठवड्यात दिल्ली अंडर-23 संघाकडून बंगालविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याने 80 धावाही फटकावल्या होत्या. त्यामुळे मनजोत कालरा हा रणजी टीममध्ये शिखर धवन याची जागा घेण्याच्या स्पर्धेत होता. परंतु आता तो वर्षभरासाठी रणजी क्रिकेट खेळू शकणार नाही. एकीकडे मनोजत कालरा याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असतानाच दिल्लीचा उपकर्णधार नितीश राणा याच्यावरील वयचोरीप्रकरणीच कारवाई मागे घेण्यात आली आहे. पुरेसे पुरावे सादर करा, अशा सूचना देत नितीश राणा याला सोडून देण्यात आलं आहे. पुन्हा नव्याने होणार तपास? दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन (DDCA)मध्ये दीपक वर्मा हे नवे लोकपाल म्हणून येणार आहेत. त्यामुळे दीपक वर्मा हे मनजोत कालरा प्रकरणात पुन्हा नव्याने तपास करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसंच वयचोरीवरून कालरा याला सीनिअर स्तरावरील क्रिकेट खेळण्यापासून का रोखण्यात आलं आहे, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







