बाप तसा बेटा! ज्युनिअर द्रविडनं 14व्या वर्षीच ठोकले द्विशतक

बाप तसा बेटा! ज्युनिअर द्रविडनं 14व्या वर्षीच ठोकले द्विशतक

क्रिकेट असो किंवा कोणतेही क्षेत्र वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक मुलं पुढे आली. मात्र आपली स्वत:ची ओळख निर्माण करणारी फार थोडी असताता.

  • Share this:

बंगळुरू, 21 डिसेंबर : क्रिकेट असो किंवा कोणतेही क्षेत्र वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक मुलं पुढे आली. मात्र आपली स्वत:ची ओळख निर्माण करणारी फार थोडी असताता. एकीकडे अर्जुन तेंडुलकर आपल्या गोलंदाजीनं चर्चेत असताना आता ज्युनिअर द्रविडही यात सामिल झाला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुलगा समितनं (Samit Dravid) अंडर-14 वर्षांच्या राज्यस्तरीय सामन्यात द्विशतकी खेळी केली.

14 वर्षांच्या समितनं अंडर-14 झोनल टूर्नामेंटमध्ये वाइस प्रेसिडेंट एकादश या संघाकडून खेळताना 201 धावांची खेळी केली. समितनं केवळ 256 चेंडूत 22 चौकार लगावत ही कामगिरी केली. समितच्या या खेळीच्या जोरावर हा सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावात चांगली फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावामध्ये त्यानं 94 धावा केल्या. तर गोलंदाजीमध्येही त्यानं 3 विकेट घेण्याची कामगिरी केली. याआधीही कर्नाटक राज्य क्रिकेट एसोसिएशनकडून (Karnataka State Cricket Association) समितनं जबरदस्त कामगिरी केली आहे.

वाचा-IPL Auctionमध्ये ‘या’ मिस्ट्री गर्लनं लावली कोट्यावधींची बोली, नेटकरीही फिदा

याआधीही समितने खेळली आहे मॅचविनिंग खेळी

समितने 2018मध्ये कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या बीटीआर चषक अंडर -14 आंतरशालेय स्पर्धेत 150 धावांची जबरदस्त खेळी केली होती. तर, दोन वर्षांपूर्वी त्याने टायगर कप क्रिकेट स्पर्धेत बेंगळुरू युनायटेड क्रिकेट क्लबकडून खेळताना फ्रॅंक अँथनी पब्लिक स्कूलविरुद्ध 125 धावा केल्या होत्या. सप्टेंबर 2015 मध्ये अंडर 12 गोपालन क्रिकेट चॅलेंजमध्ये 9 वर्षीय समितची सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड झाली. या स्पर्धेत त्याने मलाया अदिती शाळेकडून त्यानं तीन सामन्यात 77, 93 आणि नाबाद 77 धावांची खेळी केली होती.

वाचा-बुमराहला मोठा झटका! 'या' कारणामुळं द्रविडनं फिटनेस टेस्ट घेण्यास दिला नकार

द्रविड एक महान फलंदाज आहे

राहुल द्रविड सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रभारी आहे. जुलैपासून द्रविड या पदावर आले. त्याने भारताकडून 164 कसोटी सामने खेळले यात 52.31च्या सरासरीने 13 हजार 288 धावा केल्या आहेत. तर, त्याच्या नावावर कसोटीत 36 शतक आणि 63 अर्धशतक आहे. त्याचबरोबर 344 एकदिवसीय सामन्यात त्याने 39.16च्या सरासरीने 10 हजार 889 धावा केल्या आहेत. यात 12 शतक आणि 83 अर्धशतकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर द्रविडनं अंडर-19 संघांचा प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाला अनेक युवा खेळाडू दिले.

वाचा-विकेट घेतल्यानंतर गोलंदाजानं मैदानातच केला अजब स्टंट, पाहा सेलिब्रेशनचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2019 12:41 PM IST

ताज्या बातम्या