IPL Auctionमध्ये ‘या’ मिस्ट्री गर्लनं लावली कोट्यावधींची बोली, नेटकरीही फिदा

IPL Auctionमध्ये ‘या’ मिस्ट्री गर्लनं लावली कोट्यावधींची बोली, नेटकरीही फिदा

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव झाला. या लिलावात खेळाडूंपेक्षा जास्त चर्चा झाली ती मिस्ट्री गर्लची.

  • Share this:

कोलकाता, 20 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव झाला. या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्सला 15.50 कोटींची सर्वात जास्त बोली लागली. कोलकाता संघानं कमिन्सला विकत घेतले तर, ग्लेन मॅक्सवेलसाठी पंजाब संघानं 10.75 कोटींची किंमत मोजली. या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने सर्वाधिक 42.70 कोटी रुपयांचा सहभाग नोंदविला. मात्र या लिलावात खेळाडूंपेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ती एका मिस्ट्री गर्लची. सनरायझर्स हैदराबादकडून खेळाडूंवर बोली लावणाऱ्या या मुलीनं सर्वांचेच लक्ष वेधले.

गुरुवारी आयपीएल 2019 च्या लिलावादरम्यान सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शन व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांच्यासमवेत, एक रहस्यमय मुलगी दिसली, जी वारंवार खेळाडूंवर बोली लावताना दिसत होती.. पहिली खरेदी करण्यासाठी एसआरएचला जवळपास एक तास लागला, परंतु तोपर्यंत मिस्ट्री गर्लनं सोशल मीडियावर खळबळ उडवली.

वाचा-IPLसाठी कुंबळेचा खास प्लॅन, दिग्गज मुंबईकर खेळाडू झाला पंजाबचा बॅटिंग कोच

ही मुलगी इतर कोणीही नसून हैदराबाद संघाचे मालक कलानिथ मारन यांनी 27 वर्षांची मुलगी आहे. काव्या मारन असे या मुलीचे नाव असून ती फ्रँचायझीची सहकारी मालक आहे. काव्या एक क्रिकेट प्रेमी असून सध्या ती जो SUN टीव्ही आणि SUN टीव्हीच्या एफएम वाहिन्यांचे काम पाहते.

वाचा-पाचव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी पलटन सज्ज! असा आहे मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

वाचा-CSKच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, धोनीकडून काढून घेणार कर्णधारपद?

काव्या सर्वप्रथम आयपीएल 2018 दरम्यान दिसली होती. यावेळी काव्या कोप्पलच्या राजीव गांधी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान हैदराबादचे समर्थन करताना दिसली होती. काव्याचे चेन्नई येथून एमबीए केले असून सध्या तिचे संपूर्ण लक्ष आयपीएलवर आहे.

Tags:
First Published: Dec 20, 2019 02:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading