जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / बुमराहला मोठा झटका! 'या' कारणामुळं द्रविडनं फिटनेस टेस्ट घेण्यास दिला नकार

बुमराहला मोठा झटका! 'या' कारणामुळं द्रविडनं फिटनेस टेस्ट घेण्यास दिला नकार

भारताचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराह यानं दुखापतीनंतर न्यूझीलंड दौऱ्यात कमबॅक केला. मात्र बुमराहला चांगली खेळी करता आली नाही. वर्ल्ड कप 2019नंतर बुमराहनं 5 टी-20 सामने खेळले. त्यानंतर तो जखमी झाला.

भारताचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराह यानं दुखापतीनंतर न्यूझीलंड दौऱ्यात कमबॅक केला. मात्र बुमराहला चांगली खेळी करता आली नाही. वर्ल्ड कप 2019नंतर बुमराहनं 5 टी-20 सामने खेळले. त्यानंतर तो जखमी झाला.

बुमराहच्या फिटनेसवरून द्रविड आणि गांगुलीमध्ये वाद? जाणून घ्या काय आहे प्रकरण.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू, 20 डिसेंबर : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मात्र पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं बुमराहची तंदुरुस्ती भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. मात्र बुमराह आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील वाढणारी दरी भारतीय संघासाठी चिंतेची आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वात बंगळुरुस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीनं दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या जसप्रीत बुमराहची फिटनेस टेस्ट देण्यास नकार दिला आहे. याआधी 10 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाच्या नेट नेटमध्ये बुमराह गोलंदाजी करतान दिसला होता. सध्या बुमराह बंगळुरूमध्ये ट्रेनिंग घेत होते. पण टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार एनसीएचे संचालक राहुल द्रविड आणि फिजिओथेरपिस्ट आशिष कौशिक यांनी बुमराहची फिटनेस टेस्ट घेण्यास नकार दिला. वाचा- IPLसाठी कुंबळेचा खास प्लॅन, दिग्गज मुंबईकर खेळाडू झाला पंजाबचा बॅटिंग कोच एनसीएमध्ये जाण्यास तयार नव्हता बुमराह दरम्यान याआधी राहुल द्रविडच्या नेतृत्वात असलेल्या नॅशनल क्रिकेट अकादमीनं बुमराह वैयक्तिक तज्ञांसह मदतीनं दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळं आम्ही त्याची फिटनेस टेस्ट कशी घेणार?, असा सवाल विचारला होता. यावर्षी सप्टेंबरमध्ये बुमराहला फ्रॅक्चर झाला होता, त्यानंतर ते डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी लंडनलाही गेला होता. अहवालानुसार जसप्रीत बुमराह यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले होते की ते एनसीएमध्ये जाण्यास तयार नाहीत. त्याचबरोबर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही राहुल द्रविडशी यासंदर्भात बोलले होते. वाचा- पाचव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी पलटन सज्ज! असा आहे मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ अशी आहे एनसीएची भुमिका नोव्हेंबरमध्ये असा एक मीडिया रिपोर्टही समोर आला होता की बुमराह दुखापतीतून सावरण्यासाठी आपल्या वैयक्तिक तज्ञांसमवेत वेळ घालवत आहे. विशाखापट्टणममध्ये नेटमध्ये बुमराह गोलंदाजी करताना दिसला होता. संघ व्यवस्थापनाच्या वरिष्ठ सदस्याने असेही म्हटले आहे की बुमराहने उत्तम फिटनेस मिळवले आहे आणि तो खूपच चांगला दिसत आहे. विशाखापट्टणमच्या गोलंदाजीनंतर बुमराह बंगळुरूला रवाना झाला जेथे त्याची फिटनेस चाचणी होणार होती. तिथे द्रविड (राहुल द्रविड) बुमराहला भेटला आणि त्याला सांगितले की एनसीए त्याची फिटनेस टेस्ट घेणार नाही. या संदर्भात द्रविडचे मत स्पष्ट आहे की, जेव्हा एनसीएने द्रविडशी अजिबात उपचार केले नाहीत, तर मग तो त्याला तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र कसे देऊ शकेल. काहीतरी चुकले तर काय होईल? एनसीए अशा कोणत्याही गोष्टीसाठी प्रमाणपत्र कसे देऊ शकते, ज्याबद्दल त्याला काहीच माहिती नाही. वाचा- IPL 2020 : असे आहे यंदाचे संघ, केएल राहुल सांभाळणार पंजाबची कमान! ‘बुमराहसोबत अशी वागणूक योग्य नाही’ एका वृत्तसंस्थेशी बोलताना सूत्रांनी, “जसप्रीत बुमराहला एनसीएमध्ये जाण्याची इच्छा नाही. बहुतेक ज्येष्ठ खेळाडूंना तिथे जायचे नसते. खेळाडूंना एनसीएमध्ये का जायचे नाही हे समजण्याऐवजी एनसीएने फिटनेस टेस्ट देण्यास नकार दिला. गेल्या दोन वर्षात ज्या खेळाडूने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आहे त्याच्याशी असे वागण्याची गरज नाही”, अशी माहिती दिली. वाचा- सलग चारवेळा दहावीत झाला होता नापास, आता IPLनं केले मालामाल! सौरव गांगुली करणार द्रविडशी चर्चा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही या संपूर्ण प्रकरणावर मौन तोडले आहे.गांगुलीनं, ‘जसप्रीत बुमराहची फिटनेस टेस्ट देण्यास एनसीएने का नकार दिला आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेन. एनसीए हे प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचे प्राथमिक केंद्र असले पाहिजे. मी बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवस झाले आहेत. मी राहुल द्रविडशी बोलणार आहे. आम्ही यापूर्वीही काही प्रसंगी भेटलो आहोत. आम्ही समस्या समजून घेऊ आणि त्यावर उपाय शोधू", असे सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात