विकेट घेतल्यानंतर गोलंदाजानं मैदानातच केला अजब स्टंट, पाहा सेलिब्रेशनचा भन्नाट VIDEO

विकेट घेतल्यानंतर गोलंदाजानं मैदानातच केला अजब स्टंट, पाहा सेलिब्रेशनचा भन्नाट VIDEO

बिग बॅश लीगमध्ये हॉबर्ट हरिकेंस आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एक अजब सेलिब्रेशन करण्यात आले.

  • Share this:

मेलबर्न, 20 डिसेंबर : क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूची एक सेलिब्रेशनची वेगळी स्टाईल असते. जसे, वेस्ट इंडिजचे खेळाडू मैदानात नाचत आनंद साजरा करतात, तसाच ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर शतक झळकावल्यानंतर एका खास शैलीत उडी मारून साजरा करतो. मात्र सध्या होत असलेल्या बीग बॅश लीगमध्ये एक भलताच प्रकार पाहायला मिळाला. याआधी एका स्पर्धेत एका खेळाडूनं मैदानात जादू दाखवली होती. बिग बॅश लीगमध्ये हॉबर्ट हरिकेंस आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एक अजब सेलिब्रेशन करण्यात आले.

या सामन्यात अफगाणिस्तानचा 19 वर्षीय फिरकीपटू कॅस अहमद हॉबर्ट हरिकेंससाठी सिडनी सिक्सर्स डावाच्या दहाव्या षटकात आला. या षटकात त्याने इंग्लंडचा फलंदाज टॉम करेनला शानदार लेगस्पिनवर बाद केले. टॉम करन बाद होताच कैस अहमदने थोड्या अंतरावर धाव घेतली आणि नंतर उडी मारुन चमत्कारिक पद्धतीने आनंद साजरा केला.

वाचा-बुमराहला मोठा झटका! 'या' कारणामुळं द्रविडनं फिटनेस टेस्ट घेण्यास दिला नकार

वाचा-IPL Auctionमध्ये ‘या’ मिस्ट्री गर्लनं लावली कोट्यावधींची बोली, नेटकरीही फिदा

कॅस अहमदने चार गडी बाद केले

अफगाणिस्तानचा 19 वर्षीय कॅस अहमदनं होबार्ट हरिकेंसच्या विजयाचा नायक होता. त्याने या सामन्यात चार विकेट्स घेतल्या. चार षटकांत कॅस अहमदने सिडनी सिक्सर्सच्या चार खेळाडूंना बाद केले, त्याचबरोबर 3च्या इकॉनॉमी रेटने केवळ 12 धावा केल्या. या सामन्यात हॉबर्ट हरिकेने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 129 धावा केल्या. कॅस अहमदच्या प्राणघातक गोलंदाजीला प्रत्युत्तर देताना सिडनी सिक्सर्स संघ 25 धावांनी पराभूत झाला.

वाचा-IPLसाठी कुंबळेचा खास प्लॅन, दिग्गज मुंबईकर खेळाडू झाला पंजाबचा बॅटिंग कोच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या