जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अभिनंदन! ग्लॅमरपासून दूर असलेल्या या 'स्टार किड'नं घातली देशाच्या सन्मानात भर

अभिनंदन! ग्लॅमरपासून दूर असलेल्या या 'स्टार किड'नं घातली देशाच्या सन्मानात भर

अभिनंदन! ग्लॅमरपासून दूर असलेल्या या 'स्टार किड'नं घातली देशाच्या सन्मानात भर

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चर्चा सुरू असतानाच बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या या अभिनेत्याचा मुलगा मात्र या सगळ्यापासून खूप दूर आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 26 सप्टेंबर :  सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चर्चा आहे. अनेक स्टार किड्स आजकाल बॉलिवूड पदार्पण करत आहेत. तर अद्याप बॉलिवूड पदार्पण न करता काही स्टार किड्सचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. पण बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या आर. माधवनचा मुलगा मात्र या सगळ्यापासून खूप दूर आहे. ग्लॅमरपासून दूर असलेल्या आर माधवनचा मुलगा वेदांतनं ‘एशियन एज ग्रुप स्विमिंग चँपियनशिप’मध्ये रौप्य पदक जिंकत देशाच्या सन्मानात भर घातली आहे. आर माधवनचा 14 वर्षीय मुलगा वेदांत हा स्विमर असून नुकताच त्यानं ‘एशियन एज ग्रुप स्विमिंग चँपियनशिप’मध्ये सहभाग घेतला होता. त्यानं 4x100 मीटर फ्रीस्‍टाइल रिलेमध्ये हे पदक जिंकलं. त्याच्यासोबत उत्‍कर्ष पाटिल, साहिल लसकर आणि शोन गांगुली यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत थायलंडच्या संघाला सुवर्ण पदक पटकावलं, तर जपानच्या संघाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. याआधी या स्पर्धेत भारताच्या पुरुषाच्या संघानं सुवर्ण पदक जिंकलं होतं. वीरधवल खाडे, श्रीहरि नटराज, आनंद अनिल कुमार आणि सजन प्रकाश यांच्या चौकडीनं ही सुवर्ण कामगिरी केली होती. TRP मीटर : कशात रंगलाय प्रेक्षकांचा जीव? या आठवड्यातल्या टॉप 5 मालिका

    जाहिरात

    आर माधवननं त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलाच्या या विजयी कामगिरीची पोस्ट शेअर केली. त्यानं लिहिलं, ‘भारताला ‘एशियन एज ग्रुप स्विमिंग चँपियनशिप’मध्ये सिल्व्हर मेडल मिळालं, देवाच्या कृपेनं वेदांतचं हे पहिलं अधिकृत मेडल आहे.’ यावेळी त्यानं वेदांत आणि त्याच्या टीमचा फोटो शेअर केला आहे. यात ते सर्व मेडलसह दिसत आहेत. माधवनच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी वेदांत आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाचा घायाळ करणारा लुक, कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही अर्जुन कपूर माधवननं या अगोदरही आपल्या मुलाच्या यशाबद्दल सोशल मीडियावर अने पोस्ट केल्या आहेत. मागच्या वर्षी वेदांतनं थायलंडमध्ये इंटरनॅशनल स्विम मीटमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यावेळी वेदांतचा फोटो शेअर करत माधवननं लिहिलं, मी आणि सरितासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. वेदांतनं भारतासाठी इंटरनॅशनल स्विम मीटमध्ये कांस्य पदक जिंकलं.

    माधवननं साउथसोबतच बॉलीवुडमध्येही अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.  त्यानं बॉलिवूडच्या ‘रामजी लंदन वाले’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘रंग दे बसंती’, ‘तनु वेड्स मनु’, ‘3 ईडियट्स’, ‘साला खड़ूस’ या सिनेमात काम केलं आहे. त्याचा आगामी सिनेमा ‘द नंबी इफेक्‍ट’ आहे. हा सिनेमा इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. पहिल्याच सिनेमानंतर बॉलिवूड सुपरस्टारला आल्या होत्या लग्नाच्या 30 हजार ऑफर्स ======================================================================== पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात