पहिल्याच सिनेमानंतर बॉलिवूड सुपरस्टारला आल्या होत्या लग्नाच्या 30 हजार ऑफर्स

या अभिनेत्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि या सोबतच त्याच्या घरी लग्नाच्या ऑफर यायलाही सुरुवात झाली.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 03:22 PM IST

पहिल्याच सिनेमानंतर बॉलिवूड सुपरस्टारला आल्या होत्या लग्नाच्या 30 हजार ऑफर्स

मुंबई, 26 सप्टेंबर : बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हॅन्डसम अभिनेते आहेत. त्यातील काही असे आहेत जे स्क्रिनवर झळकल्यानंतर प्रेक्षक त्यांना पाहतच राहतात. लुक्सबद्दल बोलायचं तर बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला ग्रीक गॉडची उपाधी मिळाली आहे. या अभिनेत्यानं फक्त अभिनयच नाही तर आपल्या नृत्याच्या कसबानंही चाहत्यांना वेड लावलं आहे. त्याच्या लुक्स बद्दल बोलायचं तर त्याची उंची, सिक्स पॅक अ‍ॅब्स बॉडी असलेला असलेला हा अभिनेता जेव्हा पहिल्यांदा स्क्रिनवर झळकला होता. त्यावेळी तर कमालच झाली होती. लाखो लोक रातोरात त्याचे चाहते झाले आणि त्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. पण या सोबतच त्याच्या घरी लग्नाच्या ऑफर यायलाही सुरुवात झाली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या अभिनेत्यानं खुलासा केला की त्यावेळी त्याच्याकडे थोड्या थोडक्या नाही तर तब्बल 30 हजार लग्नाच्या ऑफर आल्या होत्या. हा अभिनेता आहे हृतिक रोशन. हृतिकनं नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. त्याचा आगामी सिनेमा 'वॉर'च्या प्रमोशनसाठी तो आला होता. यावेळी त्याच्या पहिल्या सिनेमानंतर घडलेला हा किस्सा त्यानं शेअर केला.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार सेक्स वर्करच्या भूमिकेत

हृतिक म्हणाला, 'कहो ना प्यार है'च्या रिलीजनंतर त्याला लग्नाच्या 30 हजार ऑफर आल्या होत्या. हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेला कहो ना प्यार है हा सिनेमा 2000च्या जानेवारीमध्ये रिलीज झाला. त्यानंतर लगेचच डिसेंबर 2000 ला त्यांनं सुजैन खानशी लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र यानंतरही हृतिसाठी त्याच्या चाहतींचं प्रेम कमी झालं नाही. हृतिक  बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीपासूनच सुजैन खान हृतिकची गर्लफ्रेंड होती.

Loading...

प्रतीक्षा संपली! बहुचर्चित 'हिरकणी'मध्ये 'ही' अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

हृतिकच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचा टायगर श्रॉफसोबत वॉर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा असणार आहे. ज्यात हृतिक आणि टायगर यांच्यामध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय या सिनेमाचं 'घुंगरू' हे गाणंही रिलीज झालं असून यात हृतिक आणि वाणी कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.

'बाला शौतान का साला', अक्षय कुमारच्या Houseful 4 ची गंमतीशीर पोस्टर्स रिलीज

====================================================================

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...