मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, न्यूझीलंड दौऱ्याआधी पृथ्वी शॉला गंभीर दुखापत

टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, न्यूझीलंड दौऱ्याआधी पृथ्वी शॉला गंभीर दुखापत

शुक्रवारी (03 जानेवारी) झालेल्या मुंबई विरुध्द कर्नाटक रणजी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शॉच्या खांद्याला दुखापत झाली.

शुक्रवारी (03 जानेवारी) झालेल्या मुंबई विरुध्द कर्नाटक रणजी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शॉच्या खांद्याला दुखापत झाली.

शुक्रवारी (03 जानेवारी) झालेल्या मुंबई विरुध्द कर्नाटक रणजी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शॉच्या खांद्याला दुखापत झाली.

मुंबई, 04 जानेवारी : भारत अ संघ पुढच्या आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी रवाना होणार आहे. मात्र त्याआधीच भारताचा स्टार युवा सलामीवीर पृथ्वी शॉ जखमी झाल्यामुळं शॉ दौऱ्यावर जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुक्रवारी (03 जानेवारी) झालेल्या मुंबई विरुध्द कर्नाटक रणजी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शॉच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळं 10 जानेवारीला होणाऱ्या रवाना होणाऱ्या संघात शॉ सामिल होणार की नाही, हे अद्याप कळलेले नाही.

मुंबईकडून रणजी सामना खेळत असलेल्या पृथ्वी शॉला ओव्हरथ्रो वाचवत असताना खांद्याला चेंडू लागला. त्यामुळं त्याला लगेच मैदानाबाहेर नेले. दरम्यान लगेचच शॉचा MRI करण्यात आला आहे. त्यामुळं शॉ कमबॅक करेल अशी आशा आहे.

वाचा-दीड जीबी इंटरनेट डेटाही पुरत नसेल तर करा 'हा' रिचार्ज!

बॅननंतर नोव्हेंबरमध्ये केले होते कमबॅक

मादक पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी पृथ्वी शॉवर बीसीसीआयच्या वतीनं 8 महिन्यांची बंदी लावण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉने पुनरागमन केले. या स्पर्धेत आसामविरुद्ध त्यानं अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर 4 अर्धशतक आणि एक दुहेरी शतकही त्याच्या नावावर आहे. रणजी ट्रॉफीमध्ये बडोदाविरुद्ध शॉनं 202 धावांची खेळी केली होती.

वाचा-टी 20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियापुढे जुनेच प्रश्न!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाली होती दुखापत

बॅनच्याआधी गेल्या वर्षी पृथ्वी शॉ टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. यात त्यानं 134 धावांची आक्रमक खेळी करत पदार्पण केले होते. तीन डावांत शॉने 237 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पृथ्वीची निवड झाली होती. मात्र पहिल्या कसोटी सामन्याआधीच गंभीर जखमी झाला होता.

वाचा-Android फोन्समध्ये Apple सारखी सुविधा; या कंपन्यांचे नवे फीचर

First published:
top videos