टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ झाल्यानंतर ग्राहकांसाठी नव्या ऑफर दिल्या आहेत. एअरटेल, आयडिया-व्होडाफोन कंपन्या अनलिमिटेड कॉलिंग देत आहेत तर रिलायन्स जिओनेही ऑफर दिली आहे. डेटाच्या बाबतीत आता कंपन्यांनी काही ऑफर रिचार्ज दिले आहेत. यामध्ये दिवसभराचा डेटा संपल्यानंतर तुम्हा आणखी डेटा मिळू शकतो.
जिओने 3 जीबी डेटा देणारा प्लॅन लाँच केला आहे. 349 रुपयांच्या या रिचार्जला 28 दिवसांची मुदत आहे. यावर तुम्हाला 84 जीबी जेचा मिळेल. तसेच जिओवर फ्री कॉलिंग आणि 1000 मिनिटं इतर नेटवर्कसाठी मिळणार आहेत. याशिवाय दररोज 100 एसएमएसही मिळतील.
एअरटेलनेदेखील 3जीबी डेटाचा प्लॅन लाँच केला आहे. 28 दिवसांची मुदत असलेल्या या प्लॅनवर 84 जीबी डेटा दिला जाणार आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. तसेच दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. याशिवाय एअरटेलचं Xstream अॅपचं प्रिमियम सबस्क्रिप्शन मिळेल.
व्होडाफोनने अजुन तरी 3 जीबी डेटा देणारा प्लॅन लाँच केलेला नाही. त्यांनी याआधी 399 रुपयांचा 3 जीबी डेटाचा प्लॅन दिला होता. सध्या 299 रुपयांत 2 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनची मुदत 28 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये डेटाशिवाय अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे. असाच प्लॅन 56 दिवसांसाठी असून तो 449 रुपयांना आहे.
दुसरीकडे बीएसएनलने त्यांचा 1999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन रिवाइज केला आहे. यामध्ये ग्राहकांना 1275 जीबी डेटा मिळणार आहे. यात कॉलिंगही फ्री असणार आहे. याची मुदत एक वर्षासाठी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.