मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टी 20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियापुढे जुनेच प्रश्न!

टी 20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियापुढे जुनेच प्रश्न!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने रणनिती आखताना भारतीय संघासमोर जुनेच प्रश्न आहेत.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने रणनिती आखताना भारतीय संघासमोर जुनेच प्रश्न आहेत.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने रणनिती आखताना भारतीय संघासमोर जुनेच प्रश्न आहेत.

मुंबई, 04 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. सध्या भारतीय संघाचे लक्ष्य लंकेविरुद्धच्या मालिकेवर असले तरी रणनिती मात्र पुढच्या टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने सुरू आहे. 2020 आणि 2021 अशा सलग दोन वर्षात दोन वर्ल्ड कप होणार आहेत. यात यंदा ऑस्ट्रेलियात तर पुढच्या वर्षी भारतात टी20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आलं आहे. टी20 मध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताला पुन्हा यश मिळालेलं नाही. 2014 मध्ये लंकेविरुद्ध अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावेळी विजयाचे ध्येय टीम इंडियाचे असणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची निवड आणि रणनिती आखली जात आहे. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये फरक असला तरी भारताची दोन्ही वर्ल्ड कपच्या आधी असलेली अवस्था काही वेगळी नाही. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपवेळी जे प्रश्न भारतीय संघासमोर होते तेच पुन्हा यावेळी समोर आहेत.

भारतीय संघाची आघाडीची फळी एकदम मजबूत आहे. जगातील सर्वोच्च फलंदाजांमध्ये समावेश असलेल्या रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली हे आघाडीची बाजू सांभाळतात. सलामीला खेळणाऱ्यामंध्ये रोहितसोबत केएल राहुल किंवा शिखर धवन असतो. शिखर धवनला दुखापतीमुळे अनेकदा संघाबाहेर बसावं लागतं. सर्वोत्तम खेळाडू असलेली टॉप ऑर्डर जर अपय़शी ठरली तर मधल्या फळीत भारताची अडचण होते. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये याचाच फटका भारताला बसला होता.

मधल्या फळीची कमकुवत बाजू सातत्याने समोर येते. सध्या मधल्या फळीत श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत हे खेळतात. सावध आणि संयमी खेळीचा अभाव यांच्यात दिसत असल्यानं डाव सावरण्याची गरज असते तेव्हा भारतासमोर समस्या निर्माण होते. दबावाखाली खेळताना विकेट टिकवण्याची आवश्यकता असते. तिरुवनंतपुरममध्ये विराट कोहलीने विंडिजविरुद्ध शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून जोखीम पत्करली होती. शिवम दुबेनं हा निर्णय सार्थ ठरवला. त्याला सातत्यानं तिसऱ्या क्रमांकावर खेळवल्यानंतरच पुढे संघनिवड आणि व्यवस्थापन करता येणार आहे.

निवड समितीने नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. या खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी तयार व्हायला वेळ मिळावा यासाठी संधी दिली जात आहे. यामुळे अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर ठेवलं जात आहे. आर अश्विन आणि जडेजा या फिरकीपटूंच्या जोडीऐवजी सध्या संघात युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना जागा दिली जात आहे तर अष्टपैलू जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला पसंती दिली जात आहे. या प्रयोगात भारतीय संघाला किती यश मिळेल हे येणाऱ्या काळात समजेल.

भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. सध्या दुखापतीमधून सावरलेल्या बुमराहला वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने रणजी ट्रॉफीत खेळू दिलं नाही. सध्या संघात भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांची साथ त्याला आहे. पण या दोघांना दुखापत झाली तर कोण ? असा प्रश्न आहे. नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकुर यांना अजुन लय पकडता आलेली नाही. त्यामुळे पुढच्या नऊ महिन्यांमध्ये वेगवान गोलंदाजीत इतर पर्याय तयार करावे लागणार आहेत.

वाचा : रोहितच्या अनुपस्थितीचा विराट घेणार फायदा, हिसकावणार हिटमॅनचं सिंहासन

एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपपासून भारतीय संघात असलेल्या ऋषभ पंतच्या बेजबाबदार फलंदाजीवरून आणि यष्टीरक्षणावरून अनेकांनी टीका केली आहे. त्याच्याकडे संयम नसल्याने संघाला फटका बसत असल्याचं अनेक वेळा दिसलं आहे. तसंच यष्टीरक्षण करतानाही त्याच्या चुका समोर आल्या आहेत. त्यामुळे चुका सुधारण्याचं आव्हान त्याच्यासमोर आहे. महेंद्र सिंग धोनीनंतर त्याच्याच खांद्यावर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज होण्याची जबाबदारी असणार आहे.

वाचा : IPLमध्ये 7 वर्षे एकत्र खेळूनही मलिंगाने काहीच नाही शिकवलं, बुमराहचा खुलासा

First published:
top videos