जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोदींनी क्रिकेटच्या मैदानातून केली कॉंग्रेसमुक्त भारताची सुरुवात; वाचा UNTOLD STORY

मोदींनी क्रिकेटच्या मैदानातून केली कॉंग्रेसमुक्त भारताची सुरुवात; वाचा UNTOLD STORY

मोदींनी क्रिकेटच्या मैदानातून केली कॉंग्रेसमुक्त भारताची सुरुवात; वाचा UNTOLD STORY

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या आजपर्यंत कधीही समोर न आलेल्या त्यांच्या क्रिकेटमधील कारकिर्दीबाबत…

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014पासून भारत मुक्त कॉंग्रेस नावाची जणु एक चळवळ सुरू केली. या चळवळीत मोदींसह भारतीय जनता पक्ष यशस्वीही ठरला. मग, लोकसभा निवडणुक असो किंवा विधानसभा 2014पासून फक्त आणि फक्त भाजपचा दबदबा राहिला आहे. याला काहींनी मोदी लाट असेही नाव दिले. मात्र मोदींनी कॉग्रेसमुक्त भारताची पहिली सुरुवात केली ती गुजरातपासून. यासाठी मोदींनी कोणताही राजकीय डाव साधला नाही तर त्यांनी क्रिकेटची मदत घेतली. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या आजपर्यंत कधीही समोर न आलेल्या त्यांच्या क्रिकेटमधील कारकिर्दीबाबत… मोदींनी संपवली 16 वर्षांची कॉंग्रेसची मक्तेदारी 2009मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना मोदींनी सर्वात मोठा डाव खेळला तो म्हणजे गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून 16 वर्षांची कॉंग्रेसची मक्तेदारी संपवली. कॉंग्रेसच्या नरहर अमीन यांना मागे टाकत मोदींनी अध्यक्षपद मिळवले. त्यावेळी भारताचे सध्याचे गृहमंत्री अमित शाह हे उपाध्यक्ष होते. भले अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची जोडी राजकीय पटलावर कायम एकत्र दिसत असली त्यांची भागीदारी ही खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या मैदानावरच झाली. वाचा- PM मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; मुस्लिम राष्ट्रांनी इम्रान खान यांना फटकारले! 2014मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर दिला राजीनामा 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विक्रमी अशी आघाडी मिळवत भाजपची सत्ता आली. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी थेट भारताचे पंतप्रधान झाले. दरम्यान, पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारल्यानंतर मोदींनी गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मोदींसाठी क्रिकेट नेहमीचा खास राहिले आहे. त्यामुळं 2014च्या ब्लू प्रिंटमध्ये त्यांनी गुजरातमध्ये क्रिकेटच्या सोयी वाढवणार असल्याचे सांगितले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी तसे करूनही दाखवले. वाचा- पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड, 218 जणांविरुद्ध FIR मोदींमुळे गुजरातमध्ये तयार झाले जगातील सर्वात मोठे स्टेडियम मोदींनी क्रिकेटसाठी दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे अहमदाबाद येथील सर्वात मोठे स्टेडियम. हे स्टेडियम तब्बल 63 एकर जमिनीत उभारण्यात आले आहे, यासाठी 700 कोटींचा खर्च सरकारनं केला आहे. या स्टेडियमध्ये 1 लाख 10 हजार चाहत्यांच्या बसण्याची सोय आहे. या मैदानाचे अद्याप अनावरण झाले नसले तरी, क्रिकेटला जगातील सर्वात सुंदर स्टेडियम गुजरातला मिळाले आहे. हे स्टेडियम शहरातील मोटेरा परिसरात आहे. वाचा- भारतीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग? BCCI नाही तर ‘हा’ टॉप कॉप लावणार छडा! जीसीएचे अध्यक्ष असताना पाहिले होते स्वप्न नरेंद्र मोदी जीसीएचे अध्यक्ष असताना त्यांनी गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. 2016मध्ये मोदींनी हा स्टेडिमयचे भुमिपूजन केले. दरम्यान 2020पर्यंत या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाऊ शकतो. वाचा- समुद्रात सापडला एक विचित्र जीव, 11 लाखापेक्षा जास्त वेळा लोकांनी पाहिला हा VIDEO युतीच्या चर्चेवर काय म्हणाले गिरीष महाजन, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात