पंतप्रधान मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; मुस्लिम राष्ट्रांनी इम्रान खान यांना फटकारले!

पंतप्रधान मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; मुस्लिम राष्ट्रांनी इम्रान खान यांना फटकारले!

पाकिस्तान(Pakistan)चे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan)यांना असा काही दणका बसला आहे की ते कधीच विसरणार नाहीत.

  • Share this:

इस्लामाबाद, 16 सप्टेंबर: काश्मीरवरून(Kashmir Issue) प्रत्येक दोन दिवसांनी भारताला धमकी देणारे आणि भारताविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तान(Pakistan)चे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan)यांना असा काही दणका बसला आहे की ते कधीच विसरणार नाहीत. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा विषय आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न केला. अगदी संयुक्त राष्ट्र संघात देखील काश्मीर विषय नेला पण पाकिस्तानला कोणीच उभे करून घेतले नाही. त्यानंतर इम्रान खान यांनी अण्विक युद्धाची धमकी देखील दिली. हे सर्व करून झाल्यानंतर खान यांनी काश्मीर विषयावर जागतिक राजकारणात प्रभावशाली असलेल्या मुस्लिम देशांच्या दारात इम्रान खान गेले. पण मुस्लिम देशांनी देखील त्यांना उभे करुन घेतले नाही.

जागतिक राजकारणात प्रभावशाली असलेल्या काही मुस्लिम देशांना काश्मीर संदर्भात पंतप्रधान इम्रान खान यांना साथ दिली नाही. उटल इम्रान खान यांना सुनावले. पाकिस्तानने भारताशी अनौपचारिक चर्चा करण्याचा प्रयत्न करावा. काश्मीरवरुन सुरु असलेला तणाव कमी करण्यासाठी प्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरुद्ध सभ्य भाषेत बोलण्याचा सल्ला मुस्लिम देशांनी इम्रान खान यांना दिला आहे.

'एक्स्प्रेस ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार 3 सप्टेंबर रोजी सौदी अरबचे उप परराष्ट्र व्यवहार मंत्री आदिल अल जुबैर आणि संयुक्त अरब अमिरातचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला बिन अल नाहयान पाकिस्तान दौऱ्यावर होते. या दोन्ही नेत्यांचा पाकिस्तानचा दौरा हा पाकिस्तानला मुस्लिम देशांचा निरोप देण्यासाठी होता. एक दिवसाच्या या दौऱ्यात जुबैर आणि नाहयान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री महमूद कुरैशी आणि लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची भेट घेतली. ही बैठक अत्यंत गोपनीय आणि काही मोजक्या लोकांसोबत झाली. जुबैर आणि नाहयान यांनी मुस्लिम देशांच्या वतीने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितले की, भारतासोबत अनौपचारिक चर्चेला सुरुवात करा.

मोदींवर टीका बंद करा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तणावामध्ये सौदी आणि युएईला महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. दोन्ही देशांनी किमान पडद्यामागे तरी चर्चा सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. काश्मीरमधील ज्या नेत्यांनी बंदी करण्यात आले आहे त्यांना सोडण्यात यावे, अशी या या दोन्ही मध्यस्थांची इच्छा आहे. पण हे सर्व करताना पाकिस्तानानने PM मोदींच्या विरुद्ध टीका बंद करावी. इम्रान खान मोदींच्याविरुद्ध ज्या पद्धतीने टीका करत आहेत ती बंद करावी असे ही या दोन्ही देशांनी सांगितले आहे.

पाकने फेटाळला प्रस्ताव

सौदी आणि युएईने दिलेला प्रस्ताव पाकिस्तानने फेटाळला आहे. जोपर्यंत भारत काही अटी मान्य करत नाही तोपर्यंत चर्चा करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे.

काश्मीरमधून कलम 370 हटवणे, संचारबंदी लागू करणे, अनेक राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवणे या गोष्टींवरून इम्रान खान सातत्याने मोदींवर टीका करत आहेत. जोपर्यंत काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत भारतासोबत पडद्याआड चर्चा होणार नाही असे पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी सांगितले.

VIDEO: उद्धव आणि फडणवीसांमध्ये चढाओढ, कोण रचणार राम मंदिराची पहिली वीट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 07:59 PM IST

ताज्या बातम्या