बेंगळुरू, 16 सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयानं नेमून दिलेल्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सोमवारी तामिळनाडु प्रीमीयर लीगमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचे सांगितले. दरम्यान या आरोपावरून काही जणांची चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये एक भारतीय खेळाडू, आयपीएलमध्ये असलेल्या एकाचा आणि रणजी प्रशिक्षकाचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टेबाज आणि मॅच फिक्सर्स संघावर अवैध ताबा घेतला असून फ्रँचाईजीच्या माध्यमातून संघ असा खेळत होते जसं की सट्टेबाजांना त्याचा फायदा व्हावा. दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयच्या वतीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नेमणुक करण्यात आली होती. त्यांच्या वतीनं हा सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान बीसीसीआयच्या वतीनं पूर्ण स्पर्धेत असा प्रकार घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही महत्त्वाच्या व्यक्ती सट्टेबाजांच्या संपर्कात असून त्या व्यक्ती वेगवेगळ्या संघात असल्याचा संशय असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. या प्रकरणात पैशांची देवघेव झाल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणाची चौकशी राजस्थानचे माजी पोलिस महासंचालक आणि सध्याचे बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रमुख अजित सिंग करणार आहेत. कोण आहेत अजित सिंग अजिंत सिंग हे 1982च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दरम्यान 2018मध्ये अजिंत सिंग निवृत्ती झाल्यानंतर त्यांनी नियुक्त बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीच्या प्रमुखपदी करण्यात आली. त्यांनी दिल्लीचे पोलिस महासंचालक निरज कुमार यांची जागा घेतली. अजित सिंग यांची ओळख राजस्थानमधील टॉप कॉप अशी केली जाते. अजिंत सिंग यांनी पोलिस संचालक म्हणून जलावर, सवाई माधोपूर, जोधपूर, जयपूर आणि शिरोही काम केले होते. दरम्यान त्यांनी या प्रकरणात इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “काही खेळाडूंनी आमच्याशी संपर्क केला असून आम्ही त्यांच्याशी ज्यांनी संपर्क केला ते तपासत आहे. यात काही मेसेज व्हॉटस्अॅपवर आले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे”, असे सांगितले. वाचा- टीम इंडियाचा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये? सट्टेबाजांच्या संपर्कात असेलल्यांची चौकशी
टीएलपीएलमध्ये भारतीय खेळाडूंचा भरणा आतापर्यंत अनेकदा लहान स्पर्धांमध्ये अशा केस समोर आल्या आहेत. पण पहिल्यांदाच बीसीसीआयकडून मान्याता दिलेल्या स्पर्धेत असा प्रकार समोर आला आहे. टीएलपीएलमध्ये 8 संघ आहेत. यामध्ये भारतीय संघातील आर अश्विन, मुरली विजय, विजय शंकर, दिनेश कार्तिक, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडूही खेळतात.टीपीएलमध्ये मॅच फिक्सिंगसाठी प्रशिक्षकाला एका सट्टेबाजानं हिऱ्यांचा सेट दिला. त्याआधी प्रशिक्षकानं 25 लाख रुपयांचा सौदा ठरण्यापूर्वी एक एसयुव्ही कार मागितली होती अशी माहिती सूत्रांनी दिली. वाचा- कमाल केली राव! 867 ओव्हरनंतर ‘या’ गोलंदाजानं टाकला पहिला नो-बॉल भारताचा युवा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये? मॅच फिक्सिंग प्रकरणात युवा खेळाडू असल्याची धक्कादायक माहिती एसीयुनं दिली आहे. या खेळाडूची शिफारस एका दिग्गज क्रिकेटपटूनं केली होती. तसेच त्याच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक मदतही संघ मालकांनी त्याला केली होती अशी माहिती समजते. अद्याप कोणाचीही नावे समोर आलेली नाहीत. वाचा- फायनलपेक्षा वरचढ ठरला भारत-पाक सामना, भारतीय चाहत्यांनी मोडला मोठा विक्रम शाई झाली आता मुख्यमंत्र्यांवर जिवंत कोंबड्या फेकल्या, पाहा VIDEO