'ती घटना फक्त रोहितला माहिती', प्रवीण कुमारचा आणखी एक धक्कादायक खुलासा

'ती घटना फक्त रोहितला माहिती', प्रवीण कुमारचा आणखी एक धक्कादायक खुलासा

टीम इंडियाकडून 84 सामने खेळलेल्या खेळाडूने एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यातच घरच्या लोकांशिवाय फक्त रोहित शर्माला माहित असलेलं गुपितही त्याने यावेळी उलगडलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : भारताकडून 84 सामने खेळलेला वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने मानसिक तणावामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या खुलाशानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीत प्रवीणने सांगितलं की गेल्या आठ वर्षांपासून टीम इंडियात पुनरागमनाच्या प्रतिक्षेने इतकं निराश झालो की एक दिवस आत्महत्या करण्यासाठी गेलो. पण मुलांचा फोटो पाहिला आणि विचार बदलला.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखती प्रविणने सांगितलं की, मला खूप निराश वाटत होतं. नेहमी एकटेपणा जाणवायचा. संघात पुनरागमन करायची इच्छा होती. याचा विचार सतत केल्यानं मानसिक तणावाखाली आत्महत्या करण्याचा निर्णय़ घेतला होता.

प्रवीण कुमारने भारताडून 6 कसोटी आणि 68 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. स्विंग हे त्याच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र होतं. या जोरावरच त्यानं भारताला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक सीबी मालिका जिंकून दिली. मात्र, 2012 ला संघातून बाहेर झाल्यानंतर त्याला कधीच पुनरागमनाची संधी मिलाली नाही.

प्रवीणने असाही एक खुलासा केला जी गोष्ट घरच्या लोकांशिवाय फक्त रोहित शर्माला माहिती होती. प्रवीण कुमार टीम इंडियातून बाहेर होता. त्यानंतर 2014 मध्ये आयपीएलमध्येही कोणी खरेदी करणारा संघ नव्हता. त्यानंतर प्रवीणला रोहित शर्माने मदत केली होती. 2014 मध्ये वेगवान गोलंदाज जहीर खान दुखापतीमुळे बाहेर होता. त्याच्या जागी प्रवीणला मुंबई इंडियन्समध्ये घेण्यात रोहित शर्माने मदत केली होती.

शतकी खेळीनंतरही हिटमॅनला नाही मिळाला नंबर-1चा ताज! रोहित-विराटमध्ये संघर्ष

आपल्याला एका डोळ्याने नीट दिसत नाही. एवढंच काय खेळत असतानाही दिसत नव्हते असं प्रवीणने सांगितलं ज्यूनिअर क्रिकेट खेळत असताना डोळ्यावर चेंडू लागला होता. त्यानंतर दिल्लीत उपचार झाले. डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता पण दृष्टी परत येण्याची हमी नव्हती. तसेच दृष्टीवर आणखी परिणाम होण्याची भीती व्यक्त केली होती. वडिलांनी तेव्हा शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती प्रवीणने दिली.

रक्तबंबाळ होऊन कुंबळे खेळला क्रिकेट! पाहा तो क्षण ज्याचा मोदींनी केला उल्लेख

धीम्या गतीने आलेले किंवा बाऊन्सर खेळणं कठिण होतं. एका डोळ्यानं नीट दिसत नसल्यानं अडचणी येत होत्या. ही गोष्ट कुटुंबातील लोकांशिवाय फक्त रोहित शर्माला माहिती होती. रोहित शर्मा एक चांगला मित्र असल्याचं प्रवीणने मुलाखतीत सांगितलं.

धोनी आणि पंतला कॅप्टन कोहली देणार नारळ? संघाला मिळाला नवा विकेटकीपर!

First published: January 21, 2020, 9:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या