मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनी आणि पंतला कॅप्टन कोहली देणार नारळ? संघाला मिळाला नवा विकेटकीपर!

धोनी आणि पंतला कॅप्टन कोहली देणार नारळ? संघाला मिळाला नवा विकेटकीपर!

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 2-1ने पराभव करत मालिका विजय मिळवला.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 2-1ने पराभव करत मालिका विजय मिळवला.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 2-1ने पराभव करत मालिका विजय मिळवला.

  • Published by:  Priyanka Gawde
बंगळुरू, 20 जानेवारी : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 2-1ने पराभव करत मालिका विजय मिळवला. या विजयानंतर कोहलीनं भारताला नवा विकेटकीपर मिळाला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळं भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि युवा खेळाडू ऋषभ पंत यांच्या डच्चू मिळणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. विराट कोहलीनं सामन्यानंतर, केएल राहुल संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून राहील, असे सांगितले. याआधी 2003 वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविड ज्याप्रकारे खेळला त्याप्रमाणेच तो संघात संतुलन राखतो असेही विराट कोहली म्हणाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या डोक्याला पॅट कमिन्सचा बाउन्सर केले, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. वाचा-रोहित शर्माने सुसाट केल्या 9000 धावा, विराट कोहलीला 'हाय अलर्ट'! राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोन्ही एकदिवसीय मालिकेत फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी केली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत के.एल. राहुलबाबत विचारले असता कोहलीनं, "मला माहिता आहे की खेळाडूंच्या खेळण्याच्या जागेविषयी स्पष्टता नसेल तर त्याचा फटका संघाला बसतो. या कारणामुळे यापूर्वी आम्ही सामने गमावले आहेत. आता आम्हाला हे चांगल्याप्रकारे समजले आहे, आम्ही या अनुक्रमासह काही काळ खेळू आणि ते योग्य की चूक आहे की नाही ते ठरवू”, असे सांगितले. भारतीय संघ यापुढे कोणते बदल होती असे चिन्ह दिसत नाही आहेत. कारण यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलनं चांगली कामगिरी केली आहे. वाचा-शतक एक विक्रम अनेक! कांगारूंची शिकार करत 'हिटमॅन'ने सचिनलाही टाकले मागे ऑस्ट्रेलियाच्याविरुद्ध राहुलची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात केएल राहुलने पहिल्या सामन्यात 47, दुसर्‍या सामन्यात 80 आणि तिसर्‍या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना 19 धावा केल्या. त्याचबरोबर शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. राजकोट एकदिवसीय सामन्यात त्याने विकेटच्या मागे दोन झेल पकडला आणि एक झेल. तर बेंगळुरूने वनडेमध्ये दोन झेल घेतले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेपूर्वी राहुलने श्रीलंकेविरुद्ध दोन टी -20 सामन्यांत 45 आणि 54 धावांची डावदेखील खेळला होता. वाचा-VIDEO : स्मिथने आपल्याच कर्णधाराला दिला धोका, फिंचने मैदानातच घातल्या शिव्या!
First published:

Tags: Cricket, Kl rahul

पुढील बातम्या