मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अनोळखी बाळाच्या मदतीसाठी तिनं केला आपल्या ऑलिम्पिक पदकाचा लिलाव; संघर्षमय आहे मारियाच्या विजयाचा प्रवास

अनोळखी बाळाच्या मदतीसाठी तिनं केला आपल्या ऑलिम्पिक पदकाचा लिलाव; संघर्षमय आहे मारियाच्या विजयाचा प्रवास

तिनं एका अनोळखी बाळाच्या उपचारांसाठी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या आपल्या रौप्य पदकाचा (Silver Medal) लिलाव (Auction) केला आहे. तिच्या या पुढाकाराबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.

तिनं एका अनोळखी बाळाच्या उपचारांसाठी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या आपल्या रौप्य पदकाचा (Silver Medal) लिलाव (Auction) केला आहे. तिच्या या पुढाकाराबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.

तिनं एका अनोळखी बाळाच्या उपचारांसाठी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या आपल्या रौप्य पदकाचा (Silver Medal) लिलाव (Auction) केला आहे. तिच्या या पुढाकाराबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.

  नवी दिल्ली 18 ऑगस्ट : सध्या जगभरात टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा आहे. आपल्या देशासाठी पदक मिळवून जगात आपल्या देशाचा सन्मान वाढवणाऱ्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बक्षिसे दिली जात आहेत. भारतातही वेगवेगळ्या खेळांमध्ये वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जात आहे. त्यांच्यावर केंद्र सरकार, राज्य सरकार तसंच क्रीडा रसिकही बक्षीसांचा वर्षाव करत आहेत. देशासाठी पदक मिळवल्याचा आनंद आणि अभिमान या खेळाडूंनाही आहे. अनेक खेळाडूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या स्पर्धेत प्रवेश मिळवला आणि चमकदार कामगिरी केली आहे. त्यांची प्रेरणादायी कहाणी अनेक नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. अशा खेळाडूंचे भरभरून कौतुक होत आहे. खेळाडूंबद्दल सर्वांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण होत आहे. ही अभिमानाची भावना आणखी दृढ करण्याचे काम पोलिश भालाफेकपटू (Polish Javelin Player) मारिया आंद्रेजझिक (Maria Andrejczyk ) हिनं केलं आहे.

  तिनं एका अनोळखी बाळाच्या उपचारांसाठी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या आपल्या रौप्य पदकाचा (Silver Medal) लिलाव (Auction) केला आहे. तिच्या या पुढाकाराबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. एका आठ महिन्यांच्या मुलाच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी (Heart Surgery) निधी उभारण्यासाठी पोलंडची भालाफेकपटू मारिया आंद्रेजझिक हिनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या रौप्य पदकाचा लिलाव केला आहे. टाईम्स नाउ न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर, 2 दिग्गजांचा समावेश नाही

  आंद्रेजझिकनं 2016 मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये फक्त 2 सेंटीमीटरने पदक गमावलं होतं. 2017 मध्ये तिला खांद्याच्या दुखापतीचा त्रास झाला आणि 2018 मध्ये तिला हाडांच्या कर्करोगाचे निदान झालं, त्यातून बरं झाल्यानंतर तिनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकून दमदार पुनरागमन केलं आहे. अशा या विजीगिषु वृत्तीच्या खेळाडूनं एका अनोळखी बाळाच्या मदतीसाठी धावून जात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

  टोटल अॅनॉमॅलस पल्मोनरी व्हेनस कनेक्शन (टीएपीव्हीसी) असा आजार असलेल्या मिलोझेक नावाच्या आठ महिन्यांच्या बाळावर तातडीनं हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यानं त्याकरता 1.5 दशलक्ष पोलिश झ्लोटी म्हणजेच तब्बल 2 कोटी 86 लाख रुपयांची आवश्यकता होती. यासाठी मदत करण्याचं आवाहन फेसबुकवर करण्यात आलं होतं. मारिया आंद्रेजझिकनं हे आवाहन वाचलं आणि तत्काळ तिनं त्या बाळाला मदत करण्याचा निर्णय घेतला. तिनं आपण आपल्या ऑलिम्पिक रौप्य पदकाचा लिलाव करून निम्मी रक्कम जमा करत असल्याचं जाहीर केलं. ‘मिलोझेकला हृदयाचा गंभीर आजार आहे. त्याला ऑपरेशनची गरज आहे. मला त्याला मदत करायची असल्यानं मी त्याच्यासाठी माझ्या ऑलिम्पिक रौप्य पदकाचा लिलाव करत आहे.’ असा संदेशही तिनं फेसबुकवर लिहिला.

  भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास, 13 वर्षांपूर्वी सुरू झालं 'विराट पर्व'

  दरम्यान, सोमवारी पोलंडमधील झब्का (Zabka) या प्रसिद्ध सुपरमार्केट चेननं तिचं पदक 1.4 कोटी रुपयांची बोली लावत लिलावात विकत घेतलं. विशेष म्हणजे या स्टोअरनं मारियाला तिचं ऑलिम्पिक रौप्य पदक परत देण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे या बाळासाठी 90 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे.

  First published:

  Tags: Olympic, Olympics 2021