मुंबई, 18 ऑगस्ट : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखालील टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याचवेळी आणखी एक टीम इंडिया पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. भारतीय महिलांची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तीन वन-डे, तीन टी20 आणि एक टेस्ट मॅचची ही मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन टीमची घोषणा झाली आहे. भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं 18 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची स्टार स्पिनर जेस जोनासनला (Jess Jonassen) या टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. तर मेगन स्कूटनं (Megan Schutt) या दौऱ्यातून माघार घेतली आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मॅटलेन ब्राऊनचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील टीममध्ये तिचा समावेश नव्हता. भारतीय टीमच्या या दौऱ्याला 19 सप्टेंबर रोजी वन-डे मॅचनं सुरुवात होईल. 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान वन-डे मालिका होणार आहे. त्यानंतर 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या दरम्यान या मालिकेतील एकमेव टेस्ट होईल. भारतीय महिला टीम या दौऱ्यात पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट खेळणार आहे. तर 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका होईल. IND vs ENG: विराट कोहली कुठे चुकतोय? सचिननं सांगितलं कारण, रोहितबद्दल म्हणाला… ऑस्ट्रेलियाची टीम : मेग लॅगिंग (कॅप्टन), रेचल हायन्स, डार्सी ब्राऊन, मॅटलेन ब्राऊन, स्टेला कँपबेल, निकोला कॅरी, हना डार्लिंगटन, एश्ले गार्डनर, एलिसा हिली, तालिया मॅकग्रा, सोफी मोलीन्यूक्स, बेथ मूने, एलिसा पेरी, जॉर्जिया रेडमायन, मोली स्ट्रानो, एनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेरहम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.