मुंबई, 18 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी आजचा दिवस खास आहे. सुनील गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी या क्रिकेट सुपरस्टार्सच्या देशातील आणखी एका सुपरस्टारनं आजच्याच दिवशी 13 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. क्रिकेटचा कोणताही प्रकार असो, मॅच भारतामध्ये असो वा विदेशात, पहिली इनिंग असो वा दुसरी इनिंग प्रत्येक देशात, प्रत्येक टीमविरुद्ध आणि सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्यानं टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. त्याचं रन काढण्याच्या अफाट सातत्यामुळेच त्याला रनमशिन असंही म्हणतात. त्याचबरोबर तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर 1 बॅट्समन आहे.
ही सर्व वैशिष्ट्य एकाच खेळाडूला लागू होतात. त्याचं नाव आहे विराट कोहली (Virat Kohli). विराटनं आजच्याच दिवशी 13 वर्षांपूर्वी (13 ऑगस्ट 2008) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याचवर्षी टीम इंडियानं अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्या टीमचा विराट कॅप्टन होता. त्याचबरोबर त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी होती. त्यामुळेच विराटची श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली. श्रीलंकेविरुद्ध दाम्बुला वन-डेमध्ये विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
ओपनिंगला आला होता विराट
विराट कोहली त्याच्या पदार्पणातील आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) ओपनिंगला आला होता. त्याने त्या मॅचमध्ये फक्त 12 रन केले. सर्वच भारतीय बॅट्समननं त्या मॅचमध्ये निराशा केल्यानं टीम इंडिया 146 रनवर ऑल आऊट झाली. टीम इंडियानं ती मॅच गमावली असली तरी भारतीय क्रिकेटमधील 'विराट पर्वा' ला त्याच दिवशी सुरूवात झाली.
#OnThisDay in 2008, @imVkohli made his debut in international cricket.
13 years later, with 4⃣3⃣8⃣ international matches & 2⃣2⃣,9⃣3⃣7⃣ runs under his belt, the #TeamIndia captain remains one of the finest cricketers going around. 👏 🙌 pic.twitter.com/hQaihyNQJF — BCCI (@BCCI) August 18, 2021
विराटची कारकिर्द
विराट कोहलीनं 94 टेस्ट मॅचमध्ये 51.41 च्या सरासरीनं 7609 रन केले आहेत. यामध्ये 27 शतक आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. वन-डे क्रिकेटमध्ये विराटचा रेकॉर्ड आणखी चांगला आहे. त्यानं 254 वन-डेमध्ये 59.07 च्या सरासरीनं 12169 रन केले आहेत. यामध्ये 43 शतक आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 90 आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये त्यानं 52.65 च्या सरासरीनं 3159 रन केले असून यामध्ये 28 अर्धशतकांचा समावेश आहे.
IND vs ENG: आता टीम इंडियाचा पराभव अवघड! 54 वर्षांचा आहे जबरदस्त रेकॉर्ड
विराट कोहली टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतानं ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली असून आता इंग्लंडमध्ये सीरिज जिंकण्याची संधी देखील त्याला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Virat kohli