Cricket news: क्रिकेट सामन्यादरम्यान मारहाण; प्रतिस्पर्धीनं चेहऱ्यावर ठोसा मारल्यानं खेळाडू जखमी

Cricket news: क्रिकेट सामन्यादरम्यान मारहाण; प्रतिस्पर्धीनं चेहऱ्यावर ठोसा मारल्यानं खेळाडू जखमी

क्रिकेट (Cricket) सामन्यादरम्यान एका संघातील खेळाडूनं दुसऱ्या संघातील खेळाडूच्या चेहऱ्यावर जोरानं ठोसा (Punch) मारला. यात समोरील खेळाडू जागेवरच बेशुद्ध झाला.

  • Share this:

नवी दिल्ली 23 मार्च : क्रिकेटच्या मैदानावरील (Cricket Ground) वाद (Fight) काही नवीन नाहीत. अनेकदा शाब्दिक चकमकींचं रुपांतर अगदी मारहाणीत झाल्याचंही आढळतं. अशीच एक घटना आता न्यूझीलंडमधील (New Zealand) ऑकलंडमधील (Auckland) कम्युनिटी क्रिकेट (Community Cricket) सामन्यादरम्यान घडली आहे. यामध्ये एका संघातील खेळाडूनं दुसऱ्या संघातील खेळाडूच्या चेहऱ्यावर जोरानं ठोसा (Punch) मारला. यात तो खेळाडू जागेवरच बेशुद्ध झाला. नंतर बऱ्याच वेळानं त्याला शुद्ध आली.

न्यूझीलंडमधील वर्तमानपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, ऑकलंडमधील पाकुरंगामध्ये (Pakuranga) खेळल्या जाणाऱ्या एका क्रिकेट सामन्यात न्यू लिन क्रिकेट क्लबसाठी (New Lean Cricket Club) अर्शद बशीर (Arshad Basheer) बॉलिंग करत होता. त्याच्या एका बॉलला नो बॉल जाहीर करण्यात आलं. त्यावर बशीर यानं बेईमानी करू नका असं म्हटलं. हे ऐकून प्रतिस्पर्धी हौविक क्रिकेट क्लबचा (Hauik Cricket Club) एक खेळाडू चिडला आणि त्यानं बशीर याच्या चेहऱ्यावर जोरानं मारलं. हा मार इतका जबरदस्त होता की बशीर जागीच कोसळला आणि बेशुद्ध पडला. काही मिनिटांच्या अवधीनंतर तो शुद्धीवर आला.

ऑकलंड क्रिकेट वादात नंतर बशीरनं आरोप केला की, ज्या खेळाडूनं त्याला मारलं त्यानं आधी बशीर याची कॉलर पकडली होती. बशीरनं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं त्याला मारलं. बशीरनं पोलिसात याची तक्रार केली आहे. बशीर ऑकलंडमध्ये अर्धवेळ नोकरी करतो आणि तो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. बशीरनं पोलिसात तक्रार दिली असली तरी अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. बशीरनं आपल्याला मारहाण करणाऱ्या खेळाडूवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ऑकलंड कम्यूनिटी क्रिकेट बोर्डाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून बोर्ड याप्रकरणी सर्व सहकार्य करत आहे, अशी माहिती ऑकलंड कम्युनिटी क्रिकेटच्या व्यवस्थापकांनी दिली.

क्रिकेटच्या मैदानावरील वाद काही नवीन नाहीत. स्थानिक क्रिकेट क्लबचे सामने असोत किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, खेळाडूंचे वाद होत असतात. काही खेळाडू शाब्दिक टिप्पणी करून प्रतिस्पर्धी खेळाडूंचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत असतात. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अशा स्लेजिंगसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा शाब्दिक चकमकीचं रुपांतर बाचाबाचीत किंवा मारामारीपर्यंत पोहोचल्याच्या अनेक घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात घडल्या आहेत. अनेक प्रसिद्ध खेळाडू अशा शाब्दिक वादावादीसह मारामारीपर्यंतच्या प्रकरणात अडकून शिक्षेला पात्र ठरले आहेत. काही ऐतिहासिक वादावादीची आठवण आजही क्रिकेटविश्वात काढली जाते.

Published by: Kiran Pharate
First published: March 23, 2021, 2:02 PM IST

ताज्या बातम्या