सांगली, 23 जानेवारी : राज्यासाठी खेळताना त्यानं आईच्या मृत्यूचं दु:ख बाजूला ठेवलं आणि मैदानात उतरला. फक्त मैदानात उतरून थांबला नाही तर राज्याला विजेतेपदही मिळवून दिलं. आईचे निधन झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाळव्याच्या सौरभने खो-खो मध्ये महाराष्ट्राला अजिंक्यपद मिळवण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत त्यानं कौतुकास्पद कामगिरी केली. सांगली जिल्ह्यातील वाळव्याचा असलेल्या अजिंक्यच्या आईचे 8 जानेवारीला निधन झाले होते. आईचे रक्षा विसर्जन केल्यानंतर पुन्हा तो खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी दाखल झाला होता. आईच्या जाण्याचं दु:ख बाजूला सारून सौरभने स्पर्धेत चांगली कामगिरी केली. खेलो इंडिया अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात त्याने मोलाची कामगिरी बजावली. 19 जानेवारीला झालेल्या अंतिम सामन्यात त्याने गुजरातचा एक गडी बाद केला. अखेर महाराष्ट्राला विजेतेपद मिळाल्यानंतर सौरभने त्याच्या आईला सोनेरी श्रद्धांजलीच वाहिली. दरम्यान, जेव्हा आईचे निधन झाले तेव्हा तो उत्तर प्रदेशात राष्ट्रीय खोको स्पर्धेसाठी गेला होता. अंतिम सामना सुरु असतानाच त्याला आईच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा त्याने आपल्या भावनांना आवर घातला आणि राज्याला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मैदानात उतरला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर तो आईच्या अंत्यदर्शनासाठी आला होता. त्यानंतर रक्षा विसर्जन आटोपून तिसऱ्याच दिवशी तो आसामला रवाना झाला होता.
The Maharashtra boys and girls Kho Kho U-17 teams won the gold medals at the Khelo India Youth Games.#KIYG2020 #KheloIndia #ChaloGuwahati @KirenRijiju@sarbanandsonwal @RijijuOffice @PMOIndia @CMOfficeAssam @IndiaSports @PIB_India @DGSAI @mygovassam @YASMinistry pic.twitter.com/6DoinMA4wV
— Khelo India (@kheloindia) January 19, 2020
सौरभला खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याआधी त्याच्या आईचे उत्तरकार्यही पार पाडायचे होते. मात्र सामन्यांच्या तारखा जवळ असल्याने त्याच्याकडे कमी दिवस होते. त्यामुळे सौरभच्या आईचे रक्षाविसर्जन आणि उत्तरकार्य गावकऱ्यांनी तिसऱ्याच दिवशी आटोपून सौरभला स्पर्धेला पाठवलं होतं. वाचा : 10 चेंडूत 35 धावा करणाऱ्या खेळाडूला विराटने काढलं होतं बाहेर, आता केलं त्रिशतक