मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मोठी बातमी IPL च्या मिनी ऑक्शनपूर्वी KKR ला मोठा धक्का; सर्वांत महागड्या बॉलरनं सिझनमधून घेतली माघार

मोठी बातमी IPL च्या मिनी ऑक्शनपूर्वी KKR ला मोठा धक्का; सर्वांत महागड्या बॉलरनं सिझनमधून घेतली माघार

दोनदा चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा धक्का बसला आहे. केकेआरचा प्रमुख फास्ट बॉलर आणि ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कॅप्टन पॅट कमिन्सनं आयपीएलच्या 16व्या सिझनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दोनदा चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा धक्का बसला आहे. केकेआरचा प्रमुख फास्ट बॉलर आणि ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कॅप्टन पॅट कमिन्सनं आयपीएलच्या 16व्या सिझनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दोनदा चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा धक्का बसला आहे. केकेआरचा प्रमुख फास्ट बॉलर आणि ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कॅप्टन पॅट कमिन्सनं आयपीएलच्या 16व्या सिझनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 15 नोव्हेंबर:  पुढील वर्षी (2023) मार्च आणि मे महिन्यात इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचा (आयपीएल) 16 वा सिझन खेळवला जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी 23 डिसेंबर रोजी कोची येथे मिनी ऑक्शन होणार आहे. त्या पूर्वी खेळाडू रिटेन किंवा रिलिझ करण्यासाठी फ्रँचायझींना आयपीएलच्या प्रशासकीय समितीनं आजपर्यंतची (15 नोव्हेंबर) मुदत दिली होती. त्यानुसार, फ्रँचायझींनी बदल सुरू केले आहेत. यादरम्यान, दोनदा चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा धक्का बसला आहे. केकेआरचा प्रमुख फास्ट बॉलर आणि ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कॅप्टन पॅट कमिन्सनं आयपीएलच्या 16व्या सिझनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इंडिया टीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    पॅट कमिन्सनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून आयपीएल न खेळण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. "मी पुढील वर्षीच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. वन-डे आणि टेस्ट सीरिजमुळे पुढचे 12 महिने आंतरराष्ट्रीय वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. शिवाय, मला अॅशेस सीरिज आणि वन-डे वर्ल्ड कपपूर्वी काही दिवस विश्रांती घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी आयपीएलपासून दूर राहणार आहे," असं ट्विट त्यानं केलं आहे. पॅट कमिन्सनं आणखी एका ट्विटमध्ये केकेआरनं केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि लवकरच पुनरागमन करण्याची आशाही व्यक्त केली आहे.

    On This Day : सचिनच्या आयुष्यात 15 नोव्हेंबर आहे एकदम खास! वाचा काय आहे कारण

    2020 मध्ये केकेआरनं कमिन्ससाठी खर्च केले होते 15.50 कोटी रुपये

    2020 मध्ये कमिन्स केकेआरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. केकेआरनं 15.50 कोटी रुपये खर्च करून त्याला विकत घेतलं होतं. पण, या वर्षीच्या (2022) मेगा ऑक्शनपूर्वी, फ्रँचायझीने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि नंतर पुन्हा त्याला टीममध्ये घेतलं होतं. या वर्षीच्या मेगा ऑक्शनमध्ये कमिन्ससाठी केकेआरनं 7.25 कोटी रुपये मोजले होते. आयपीएलच्या 15व्या सिझनमध्ये त्यानं पाच मॅच खेळल्या आणि सात विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने एक अर्धशतकही झळकावलं होतं. मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या 14 बॉलमध्ये अर्धशतक झळकावून त्याने लीगमध्ये सर्वांत जलद अर्धशतक करणाऱ्या केएल राहुलची बरोबरी केली होती.

    पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन आहे. अॅरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर त्याच्याकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. राष्ट्रीय टीमची जबाबदारी असल्यामुळे आणि व्यस्त वेळापत्रकामुळे त्यानं आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्सपाठोपाठ मिचेल स्टार्कनं 2023मध्ये आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मिचेल स्टार्क 2022 आयपीएल मेगा ऑक्शनचा भाग नव्हता. त्यामुळे तो सध्या कोणत्याही टीममध्ये नाही. मात्र, डिसेंबरमध्ये होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये तो सहभागी होऊ शकला असता.

    शिष्याच्या कामगिरीनं उंचावली गुरुची मान, रोहितच्या प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातला 'हा' मानाचा पुरस्कार

    केकेआरनं तीन खेळाडूंना केलं ट्रेड

    कमिन्सच्या अगोदर केकेआरचा विकेटकीपर बॅट्समन आणि इंग्लंडचा क्रिकेटपटू सॅम बिलिंग्जनंही टेस्ट क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याच्या कारणासाठी पुढच्या वर्षीच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान केकेआरने तीन खेळाडूंना ट्रेड करून या खेळाडूंच्या अनुपस्थितीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला आहे. कोलकाता टीमनं दिल्ली कॅपिटल्सकडून ऑल राउंडर शार्दुल ठाकूर आणि गुजरात टायटन्सकडून फास बॉलर लॉकी फर्ग्युसन व विकेटकिपर बॅट्समन रहमानउल्ला गुरबाज यांना खरेदी केलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Cricket news, KKR, Sports