मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /On This Day : सचिनच्या आयुष्यात 15 नोव्हेंबर आहे एकदम खास! वाचा काय आहे कारण

On This Day : सचिनच्या आयुष्यात 15 नोव्हेंबर आहे एकदम खास! वाचा काय आहे कारण

जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू असलेल्या सचिनच्या आयुष्यात आजच्या दिवसाला (15 नोव्हेंबर) मोठं महत्त्व आहे.

जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू असलेल्या सचिनच्या आयुष्यात आजच्या दिवसाला (15 नोव्हेंबर) मोठं महत्त्व आहे.

जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू असलेल्या सचिनच्या आयुष्यात आजच्या दिवसाला (15 नोव्हेंबर) मोठं महत्त्व आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 15 नोव्हेंबर : क्रिकेट हा भारतामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आपल्या देशात क्रिकेटला धर्माचा दर्जा दिला जातो आणि सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानलं जातं. जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू असलेल्या सचिनच्या आयुष्यात आजच्या दिवसाला (15 नोव्हेंबर) मोठं महत्त्व आहे.

    आजपासून 33 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1989 साली 16 वर्षे 205 दिवस वयाच्या सचिननं कराचीतील नॅशनल स्टेडियमवर पहिली टेस्ट मॅच खेळली होती. त्यावेळी हाच सचिन एक दिवशी 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाईल, याची कुणालाही कल्पनाही नव्हती. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    सहाव्या क्रमांकावर बॅटींग

    सचिननं पदार्पण केलं त्या टेस्टमध्ये कृष्णमाचारी श्रीकांत टीम इंडियाचा कॅप्टन होता.  पहिल्या इनिंगमध्ये पाकिस्तानने 409 रन करून भारतावर दबाव आणला होता. या दबावामुळे भारताची अवस्था 4 आऊट 41 अशी बिकट झाली होती. त्यावेळी सचिन मैदानात उतरला.  सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या सचिननं 24 बॉलचा सामना करत दोन फोरच्या मदतीने 15 धावा केल्या. सचिननं मोहम्मद अझरुद्दीनसोबत 32 रनची पार्टनशीप केली होती.

    आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या वकार युनूसनं सचिनची विकेट घेतली होती. वकारने आपल्या शानदार इनस्विंगने सचिनला ‘क्लीन बोल्ड’ केलं होतं. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 262 रन्स केले. विशेष म्हणजे सचिन आणि वकार युनूससह शाहिद सईद (पाकिस्तान) आणि सलील अंकोला यांचीही ती पहिलीच टेस्ट मॅच होती. पण, शाहिद सईद आणि सलील अंकोलाची ती पहिली आणि शेवटची टेस्ट मॅच ठरली.

    दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग मिळालीच नाही

    पाकिस्ताननं आपली दुसरी इनिंग पाच विकेट्स गमावून 305 रन्सवर घोषित केली. त्यामुळे भारताला 453 रन्सचं टारगेट मिळालं. सचिनला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगची संधी मिळाली नाही. भारताच्या टॉप ऑर्डर खेळाडूंनी तीन गड्यांच्या बदल्यात 303 रन्स करून मॅच ड्रॉ केली. आपली 100 वी टेस्ट मॅच खेळणाऱ्या कपिल देव यांनी एका अर्धशतकासह सात विकेट्स घेतल्या होत्या. त्यांना 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला होता.

    सारासोबत डेटिंगच्या चर्चांवर शुभमन गिले सोडलं मौन, म्हणाला..,.

    यानंतर फैसलाबाद येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये सचिननं 172 बॉलचा सामना करून 59 रन्स करून आपली पहिली टेस्ट फिफ्टी पूर्ण केली होती. त्यानंतर लाहोर येथे झालेल्या टेस्ट मॅचमध्येही सचिननं 41 रन्स केले होते. मात्र, अब्दुल कादिरनं त्याला बोल्ड करत हाफ सेंच्युरीपासून रोखलं.

    कराची टेस्टमधील पदार्पणानंतर सचिननं मागे वळून पाहिलं नाही. त्यानं 200 टेस्ट मॅच खेळून अनेक विक्रमांची नोंद केली. 24 वर्षांच्या संस्मरणीय क्रिकेट करिअरमध्ये सचिनने, टेस्ट क्रिकेटमध्ये 53.78 च्या सरासरीने 15 हजार 921 रन्स केले. यादरम्यान त्यानं 51 सेंच्युरी आणि 68 हाफ सेंच्युरी केल्या. वन-डे क्रिकेटमध्येही त्यानं 49 सेंच्युरी आणि 86 हाफ-सेंच्युरी केल्या आहेत. म्हणजेच तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 100 सेंच्युरींची नोंद आहे.

    शिष्याच्या कामगिरीनं उंचावली गुरुची मान, रोहितच्या प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातला 'हा' मानाचा पुरस्कार

    नाकावर लागला होता बॉल

    पाकिस्तानचा क्रिकेटपटू वकार युनूसनं त्या टेस्ट सीरिजबद्दल एका मुलाखतीत काही आठवणी सांगितल्या होत्या. वकार म्हणाला होता, "सीरिजमधील पहिली टेस्ट कराचीत झाली आणि मी सचिनला लवकर आउट केलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे त्यानं 15 रन केले होते. त्यानं आपल्या छोट्या खेळीमध्ये दोन चांगले ऑन आणि स्ट्रेट ड्राईव्ह शॉट मारले होते. त्याच सीरीजमध्ये सियालकोटच्या ग्रीन टॉप विकेटवर त्यानं फिफ्टी केली. या खेळीदरम्यान त्याच्या नाकावर सुरुवातीलाच बॉल लागला होता. 16 वर्षांचा मुलगा होता तो... दुखापतीनंतर पूर्णपणे लाल झाला होता. पण, त्यानं माघार घेतली नाही."

    वकार युनूस पुढे असंही म्हणाला, "मला आठवतं, त्यावेळी सिद्धू त्याच्यासोबत बॅटिंग करत होता. दुखापत झाल्यानंतर दोघांनी पुन्हा तयार व्हायला पाच-सात मिनिटांचा वेळ घेतला. जखमी सचिननं आपली पहिली टेस्ट फिफ्टी पूर्ण केली. हाच मुलगा महान सचिन तेंडुलकर होईल, असं अजिबात वाटलं नव्हतं. नंतरच्या काळात त्यानं मैदानावर अगदी मैदानाबाहेरही जी कामगिरी केली ती आश्चर्यकारक आहे. त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं."

    'या' पाच चुकांमुळे टीम इंडियाला गमवावे लागले सलग 2 वर्ल्ड कप!

    आणखी एक कनेक्शन

    सचिन तेंडुलकरनं 2013 साली टेस्ट क्रिकेटमधील शेवटची इनिंग खेळली. योगायोग म्हणजे ती नोव्हेंबर महिन्यातील 15 तारीख होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 14 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट मॅचमधील दुसऱ्या दिवशी सचिन 74 रन केले. त्या खेळीनंतर सचिननं 24 वर्षांच्या वैभवशाली कारकिर्दीला निरोप दिला.

    First published:

    Tags: Cricket news, On this Day, Sachin tendulkar