जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Breaking: शिष्याच्या कामगिरीनं उंचावली गुरुची मान, रोहितच्या प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातला 'हा' मानाचा पुरस्कार

Breaking: शिष्याच्या कामगिरीनं उंचावली गुरुची मान, रोहितच्या प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातला 'हा' मानाचा पुरस्कार

रोहित शर्मा दिनेश लाड यांच्यासह

रोहित शर्मा दिनेश लाड यांच्यासह

Breaking: रोहित शर्माच्या आजवरच्या कारकीर्दीत लाड सरांचं योगदान फार मोठं आहे. याचाच सन्मान म्हणून आणि त्यांच्या क्रिकेटमधल्या योगदानासाठी यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी दिनेश लाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 नोव्हेंबर: रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. क्रिकेट प्रशिक्षक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे ते आजवरचे सहावे प्रशिक्षक ठरले आहेत. रोहित शर्माच्या आजवरच्या कारकीर्दीत लाड सरांचं योगदान फार मोठं आहे. रोहितला घडवण्याच त्यांचा मोठा वाटा आहे. याचाच सन्मान म्हणून आणि त्यांच्या क्रिकेटमधल्या योगदानासाठी यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी (लाईफटाईम कॅटेगरी) दिनेश लाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक देश प्रेम आझाद - कपिल देव यांचे कोच गुरुचरण सिंग - मनिंदर सिंग, किर्ती आझाद, अजय जाडेजा रमाकांत आचरेकर - सचिन तेंडुलकर सुनिता शर्मा - अंजुम चोप्रा राजकुमार शर्मा - विराट कोहली दिनेश लाड - रोहित शर्मा

News18

रोहितला घडवणारे दिनेश लाड सर दिनेश लाड गेली अनेक वर्ष क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. 1995 साली स्वामी विवेकानंद स्कूलची टीम बनवण्यासाठी लाड सर मुलांच्चा शोधात होते. त्याच शोधमोहिमेदरम्यान लाड सरांना रोहित शर्मा दिसला. त्यावेळी लाड सरांनी त्याच्या पालकांना शाळेत घेऊन येण्यासाठी सांगितलं. दुसऱ्या दिवशी रोहितचे काका त्याला शाळेत घेऊन आले आणि शाळेत अॅडमिशनही करुन दिलं. महत्वाचं म्हणजे रोहित सुरुवातीला बॉलर होता. पण नंतर तो चांगली बॅटिंगही करतो हे सरांच्या लक्षात आलं. तेव्हा लाड सरांनी त्याला एका मॅचमध्ये ओपनिंगला पाठवलं आणि तिथून पुढे रोहित यशाची एकेक पायरी चढत गेला.

News18

रोहित शर्माची देदिप्यमान कारकीर्द रोहितची पुढे मुंबई संघात वर्णी लागली. मग तो 20 व्या वर्षी भारताच्या संघातही सामील झाला. रोहित 2007 च्या टी20 वर्ल्ड कप टीमचाही सदस्य होता. पुढे भारतीय संघात रोहितनं आपलं स्थान मजबूत केलं. वन डेत एक दोन नव्हे तर तीन द्विशतकं झळकावण्याचा पराक्रम रोहितनं केला आहे. तर टी20तही त्यानं शतक ठोकलंय. आज रोहित भारताच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कॅप्टन आहे. पण रोहितच्या या सगळ्या कामगिरीचं बरंच मोठं श्रेय जातं ते लाड सरांना. हेही वाचा -  IPL 2023: वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू IPL मध्ये होणार मालामाल, पाहा कुणाला लागू शकते सर्वाधिक बोली?

News18

क्रिकेट प्रशिक्षक म्हणून मोठं योगदान केवळ रोहितच नाही तर शार्दूल ठाकूर, अंडर 19 वर्ल्ड कपविजेत्या संघातील खेळाडू अंगक्रिश रघुवंशी यांनाही दिनेश लाड यांनीच घडवलंय. याशिवाय लाड सरांचा लेक सिद्धेश लाड आधी मुंबई आणि आता गोव्याकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत आहे. दिनेश लाड सर गेली अनेक वर्ष बोरिवलीतल्या गोराईतील स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये क्रिकेट प्रशिक्षण देतात. इतकच नव्हे तर तळागाळातील क्रिकेट कौशल्य समोर आणण्यासाठी ते अनेक ठिकाणी शिबीरही घेतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात