कराची, 01 जानेवारी : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी कराची स्टेडियमवर सुरू आहे. या मैदानावर झालेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. गेल्या महिन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. तेव्हाही गोलंदाजांना या खेळपट्टीवर काहीच फायदा होत नव्हता. पुन्हा एकदा असंच चित्र या खेळपट्टीवर दिसत आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे यांनी डावाची सुरुवात केली आणि 35 षटकात 134 धावा केल्या. त्यानंतर खेळपट्टीवरून आयलँड क्रिकेटने पीसीबीवर टीका केली आहे.
हेही वाचा : एका कॅचने क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, MCCचा नियम काय सांगतो?
आयलँड क्रिकेटने ट्विटरवर म्हटलं की, "कराची रोडवर एक आणखी शतकी भागिदारी कोणत्याही अडथळ्याशिवाय. त्यांना काही टोल आणि टॅक्स लावला पाहिजे." कराचीच्या सपाट खेळपट्टीवर इंग्लंडने बॅजबॉलसारखा विजय मिळवला होता. मात्र न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्या मालिकेतील पहिला सामना खूपच निरस झाला.
हेही वाचा : पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान
आता दुसऱ्या सामन्यात पुन्हा या खेळपट्टीवर कसोटीचा निकाल लागण्याची शक्यता कमी दिसते. इंग्लंडने गेल्या महन्यात पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटती टॉम लाथम 100 चेंडूत 71 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडने त्यांची पहिली विकेट 134 धावांवर टॉम लाथमच्या रुपाने गमावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, New zealand, Pakistan