जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / एका कॅचने क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, MCCचा नियम काय सांगतो?

एका कॅचने क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, MCCचा नियम काय सांगतो?

एका कॅचने क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, MCCचा नियम काय सांगतो?

बीग बॅश लीगमध्ये सीमारेषेवर घेतलेल्या एका झेलमुळे क्रिकेटच्या नियमांवरून आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मेलबर्न, 02 जानेवारी : बीग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात ब्रिस्बेन हीटचा खेळाडू मायकल नेसरने पकडलेल्या झेलची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. यामुळे क्रिकेटच्या नियमावरून वाद सुरू झाला आहे. मायकल नेसरने सीमेबाहेर उडी मारून चेंडू पुन्हा आत ढकलला आणि तो आत येऊन झेलला. चाहत्यांना वाटतं की हा झेल योग्य पद्धतीने घेतला गेला नाही आणि पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद दिले. यामध्ये मेलबर्न क्रिकेट क्लबचा नियम काय आहे हे आता जाणून घेऊया. मेलबर्न क्रिकेट क्लबने बनवलेल्या नियमानुसारच क्रिकेट खेळलं जातं. ब्रिस्बेन हीटने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना जॉर्डन सिल्कने २३ चेंडूत ४१ धावा करत सिडनी सिक्सर्सला विजयाच्या जवळ पोहोचवले होते. तेव्हा मायकल नेसरने सीमारेषेवर झेल घेतला आणि जॉर्डन बाद झाला. शेवटी सिडनी सिक्सर्स १५ धावांनी पराभूत झाले. हेही वाचा :  भारत श्रीलंका सामना आता घरबसल्या पाहा फ्री, कुठे होणार LIVE Stream जाणून घ्या नेसरने जॉर्डनचा झेल पकडला तेव्हा तो सीमारेषेजवळ होता. पण तोल जात असल्याने चेंडू हवेत टाकून सीमारेषेपलिकडे गेला. तिथे उडी मारून हवेत चेंडू पुन्हा उडवला आणि मैदानात येऊन झेल घेतला.

जाहिरात

सामन्यानंतर बोलताना मायकल नेसरने म्हटलं की, मॅट रेनशॉनेसुद्धा असाच झेल घेतला होता. पण नियमाबद्दल मला स्पष्ट माहिती नव्हतं. मी योग्य झेल पकडला. हेही वाचा :  पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नियम १९.५.२ नुसार खेळाडू आणि चेंडूचा पहिला संपर्क सीमेच्या आत व्हायला हवा. नियम ३३.२.१ नुसार एक झेल तेव्हाच योग्य मानला जाईल जेव्हा कोणत्याही वेळी चेंडूच्या संपर्कातील क्षेत्ररक्षक झेल पूर्ण होण्याआधी सीमेबाहेर गेला नसेल. नियम ३३.२.२.४ मध्ये असं म्हटलं आहे की, चेंडू सीमेपलिकडे जाण्याआधी क्षेत्ररक्षक तो हवेत पकडतो. या नियमांमध्ये ३३.२.१ हा नियम पूर्ण असणं गरजेचं आहे. या नियमांतर्गतच पंचांनी जॉर्डन सिल्कला बाद दिलं. एमसीसीची स्थापना १८८७ मध्ये झाली होती. १८१४ मध्ये लॉर्डसमध्ये याचं मुख्यालय बनवण्यात आलं. एमसीसीकडून क्रिकेटचे नियम तयार करण्यात येतात. गरजेनुसार या नियमात वेळोवेळी बदलही केले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात