Home /News /sport /

LIVE सामन्यातच खेळाडू करत होते फिक्सिंग? व्हायरल फोटोनं खळबळ

LIVE सामन्यातच खेळाडू करत होते फिक्सिंग? व्हायरल फोटोनं खळबळ

सामना सुरू असतानाच खेळाडू करत होते मॅच फिक्स? पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये खळबळ.

    कराची, 22 फेब्रुवारी : क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग किंवा स्पॉट फिक्सिंगच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आयसीसीनं क्रिकेटमधील नियम कडक केले असले तरी, असे प्रकार स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय लीगमध्ये दिसून येतात. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League ) घडला. ही स्पर्धा सुरू होऊन दोन दिवस झाले असताना, नवीन वाद सुरू झाला आहे. पाकिस्तान सुपर लीगचा पाचवा हंगाम सध्या सुरू आहे. मुख्य म्हणजे पहिल्यांदाचा हे हंगाम पाकिस्तानमध्ये खेळले जाणार आहे. त्यामुळं चाहत्यांमध्ये उत्सुकता असली तरी हंगामाच्या दोन दिवसानंतर नवीन वादाता तोंड फुटले आहे. पेशावर जाल्मी विरुद्ध कराची किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान डगआउटमध्ये काही खेळाडू फोनवर बोलताना दिसले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली. वाचा-हैदराबादकडून IPL खेळणाऱ्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूला हवे पाकिस्तानचे नागरिकत्व? वाचा-धोनीला निवृत्ती घेण्यासाठी भाग पाडलं जातंय? गांगुलीने खास सामन्यातून वगळलं आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये आणि डगआउटमध्ये मोबाइल फोन वापरण्यास बंदी आहे. कार्यसंघ व्यवस्थापन केवळ संभाषणासाठी वॉकी टॉकी वापरू शकतात. मात्र पाकिस्तान क्रिकेट लीग दरम्यान खेळाडू चक्क फोन वापरताना दिसले. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने डगआऊटमध्ये फोन वापरल्याचा एक फोटो शेअर केला. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण कराची किंग्जचे प्रशिक्षक डीन जोन्स यांनी यावर भाष्य केले आहे. वाचा-विराटसाठी धोक्याची घंटा! 91 दिवस, 19 डावांआधी लगावले होते शतक 13 व्या ओव्हरमध्ये कॅमेराने फोनवर बोलताना पकडले सामन्याच्या 13 व्या षटकात कॅमेर्‍याने डगआऊटमध्ये एका खेळाडूला मोबाइल फोन वापरताना पकडले. असे दिसते आहे की हा खेळाडू कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. या टीमच्या प्रशिक्षकाने हे स्पष्ट केले, की फोनवर बोलणारे हे टीमचे सीईओ तारिक आहेत. ते म्हणाले की मुख्य कार्यकारी अधिकारी फक्त आपले काम करीत आहेत आणि संघाच्या सराव सत्राची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, अद्याप फोनवर बोलणारी व्यक्ती संघाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याची पुष्टी झालेली नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या